IND W vs PAK W: 3 महिन्यांनंतर, पुन्हा एकदा पुरुषांच्या T20 विश्वचषक 2024 मध्ये पाहिल्या जाणाऱ्या हाय व्होल्टेज सामन्याची प्रतीक्षा संपली आहे. क्रिकेटच्या मैदानावर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढाई पुन्हा एकदा किक्रेट चाहत्यांना बघता येत आहे. ICC महिला T20 विश्वचषक 2024 चा भारत विरुद्ध पाकिस्तान सामना दुबईमध्ये सुरु आहे. दोन्ही संघांमध्ये 3 वाजता नाणेफेक झाली. पाकिस्तानने नाणेफेक जिंकून कर्णधार फातिमा सनाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
टी-20 विश्वचषकात भारताविरुद्धच्या गोलंदाजीवर विजय मिळवून पाकिस्तान संघाने प्रथम फलंदाजी करताना 105 धावा केल्या. भारताला 8 विकेट्स मिळाल्या. अरुंधती रेड्डीने तीन आणि श्रेयंका पाटीलने 2 गडी बाद केले.
अरुंधतीने शेवटच्या षटकात पाकिस्तानला आठवा धक्का दिला. निदा दार २८ धावा करून बाद झाली. अरुंधती रेड्डीनी तिला क्लीन बोल्ड केले.
Innings Break!
A fabulous bowling display from #TeamIndia
- 1⃣0⃣6⃣
Over to our batters
: ICC
Scorecard https://t.co/eqdkvWVK4h#T20WorldCup | #INDvPAK | #WomenInBlue pic.twitter.com/fCrNt9ID8n
— BCCI Women (@BCCIWomen) October 6, 2024
पहिल्या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर पाकिस्तानने श्रीलंकेविरुद्ध उत्कृष्ट शैलीत विजय मिळवला. दुसरीकडे टीम इंडियालाही विजयाची अपेक्षा होती. पण न्यूझीलंड संघाने हरमनप्रीत अँड कंपनीचा 58 धावांनी पराभव केला. जर भारतीय संघ पाकिस्तानविरुद्ध हरला तर उपांत्य फेरीचा प्रवास आणखी कठीण होईल.