T20 World Cup: भारत आज पाकिस्तान पुन्हा भिडणार; भारतीयांसाठी दिवाळीचं मोठं गिफ्ट!

चाहत्यांना पुन्हा एकदा दिवाळीच्या दिवशी भारत पाकिस्तान सामन्याचा आनंद घेता येणार आहे.

Updated: Oct 24, 2022, 05:04 PM IST
T20 World Cup: भारत आज पाकिस्तान पुन्हा भिडणार; भारतीयांसाठी दिवाळीचं मोठं गिफ्ट! title=

मेलबर्न : भारतीयांचा दिवाळीचा आनंद द्विगुणित झाला आहे. भारत विरूद्ध पाकिस्तान या हाय व्होल्टेज सामन्यात अखेर भारताने बाजी मारली. T20 वर्ल्डकप 2022 अंतर्गत ऑस्ट्रेलियातील मेलबर्नमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानचा 4 विकेट्सने पराभव केला. अगदी अटीतटीच्या सामन्यात पाकिस्तानला हार पत्करावी लागली. मात्र चाहत्यांना पुन्हा एकदा दिवाळीच्या दिवशी पुन्हा या सामन्याचा आनंद घेता येणार आहे.

कालचा सामना फारच रंजक होता. या विजयाचा खरा शिल्पकार विराट कोहली ठरला. विराटने 53 बॉल्समध्ये नाबाद 82 रन्सची खेळी केली. यादरम्यान त्याने 4 सिक्स आणि 6 फोर मारले. यावेळी कोहलीचा स्ट्राइक रेट 154.72 होता. या खेळीसाठी कोहलीला मॅन ऑफ द मॅच देऊनही गौरवण्यात आलं.

दरम्यान याबाबत स्टार स्पोर्ट्सने एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी भारतीयांना ही दिवाळीची भेट दिली आहे. स्टार स्पोर्ट्स आज दिवाळीला रात्री ८ वाजता पुन्हा एकदा भारत विरुद्ध पाकिस्तान सामना पुन्हा दाखवणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा काल या सामन्यातील प्रत्येक चेंडूचा थरार चाहत्यांना पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. यासोबतच संपूर्ण मॅच रिप्ले हॉटस्टारवर अपलोड करण्यात आली आहे. 

कोहली-हार्दिकच्या भागीदारीने जिंकली टीम इंडिया

पुन्हा एकदा चाहत्यांना विराट कोहलीची सर्वोत्तम खेळी चाहत्यांना अनुभवता येणार आहे. कोहलीने हार्दिक पांड्यासोबत मिळून 78 बॉल्समध्ये 113 रन्सची भागीदारी करून सामन्याचं संपूर्ण रूपच पालटलं. 

टीम इंडियाने 364 दिवसांनंतर पाकिस्तानकडून पराभवाचा बदला घेतला आहे. गेल्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला होता. अर्शदीप सिंगने पाकिस्तानी फलंदाजीचे कंबरडे मोडले. अन विराट कोहलीने पाकिस्तानच्या बॉलर्सवर फटकेबाजी केली.

भारतीय संघाकडून विराट कोहलीने 53 बॉलमध्ये 82 रनची शानदार खेळी केली. तर हार्दिक पंड्याने 37 बॉलमध्ये 40 रन केले. शेवटच्या बॉलपर्यंत हा सामना गेला. शेवटच्या बॉलमध्ये भारतीय संघाला 1 रनची गरज होती. अश्विनने शेवटच्या ओव्हरवर फोर मारला.