Team India : न्यूझीलंडविरुद्धची तीन सामन्यांची एक दिवसीय मालिका टीम इंडियाने (India vs New Zealand ODI Series) 2-0 अशी खिशात घातली असून आता तिसरा एकदिवसीय सामना जिंकत न्यूझीलंडला व्हाईटवॉश (Whitwash) देण्यासाठी रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली टीम इंडिया (Team India) सज्ज झाली आहे. भारत आणि न्यूझीलंड दरम्यानचा तिसरा एकदिवसीय (India vs New Zealand 3rd ODI) सामना इंदूर इथल्या होलकर स्टेडिअमवर (Holkar Cricket Stadium, Indore) खेळवला जाणार आहे. आधी श्रीलंकेविरुद्ध आणि आता न्यूझीलंडविरुद्धची एकदिवसीय मालिका जिंकल्याने टीम इंडियात आनंदाचं वातावरण आहे.
चहलने शेअर केला सुंदर मुलीचा फोटो
न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी टीम इंडिया इंदूरला रवाला झाली. या विमान प्रवासात टीम इंडियाचा स्पीनर युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) यांच्याबरोबर एक सुंदर मुलगी प्रवास करताना दिसली. याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल (Photo Viral on Social Media) झाले आहेत. या सुंदर मुलीचा फोटो शेअर करत चहलने ही माझी ट्रॅव्हल पार्टनर (Travel Partner) असल्याचं म्हटलं आहे. आता चहलबरोबर ही सुंदर मुलगी कोण असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांना पडला आहे. इतकंच नाही तर या मुलीने टीम इंडियाची जर्सी परिधान केली असल्याने चाहते बुचकळ्यात पडले आहेत.
कोण आहे ही सुंदर मुलगी?
आता तुम्हाल प्रश्न पडला आहे की चहलबरोबर प्रवास करणारी ही मुलगी आहे तरी कोण? तर ही मुलगी नसून हा आहे क्रिकेटपटू कुलदीप यादव (Kuldeep Yadav). रायपूर विमानतळावरुन इंदूरला निघाल्यानंतर यजुवेंद्र चहलने कुलदीप यादवचा एक फोटो काढला. फिल्टरचा वापर करत चहलने कुलदीपला मुलगी बनवलं आणि तो फोटो सोशल मीडियावर शेअर केला. या फोटोला त्याने Travel Partener असं कॅप्शन दिलं आहे. चहलने शेअर केलेला हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. लाखो लोकांना या फोटोला लाईक केलं असून मजेदार प्रतिक्रियाही दिल्या आहेत.
यजुवेंद्र चहल हा टीम इंडियातला सर्वात अतरंगी खेळाडू म्हणून ओळखला जातो. मैदानावर आणि मैदानाबाहेरही तो अनेकांची खिल्ली उडवत असतो. आपले मजेदार किस्से तो सोशल मीडियवर शेअर करतो. टीम इंडियाच्या विमान प्रवासादरम्यानही तो अनेक अतरंगी प्रकार करत असतो. कुलदीप यादव आणि यजुवेंद्र चहल हे दोघंही टीम इंडियातले महत्वाचे फिरकीपटू आहेतच पण ते दोघं एकमेकांचे चांगले मित्र देखील आहेत.
टीम इंडियाने जिंकली मालिका
शनिवारी खेळल्या गेलेल्या रायपूर एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाने न्यूझीलंडवर तब्बल 8 विकेटने विजय मिळवला. या सामन्याबरोबरच टीम इंडियाने तीन सामन्यांची मालिका 2-0 अशी जिंकली. मालिकेतला शेवटचा सामना 24 जानेवारीला इंदूरच्या होळकर स्टेडिअमवर खेळवला जाणार आहे. या सामन्यात यजुवेंद्र चहलला अंतिम अकरा खेळाडूंमध्ये संधी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे कर्णधार रोहित शर्मा वॉशिंग्टन सुंदर किंवा कुलदीप यादवला या सामन्यातून विश्रांती देऊ शकतो.