T20 पाठोपाठ कसोटीचं कर्णधारपदही नाही, विराट ऐवजी या खेळाडूकडे धुरा?

न्यूझीलंड विरुद्ध कसोटीत विराट ऐवजी हा खेळाडूकडे कर्णधारपदाची जबाबदारी?

Updated: Nov 11, 2021, 03:55 PM IST
T20 पाठोपाठ कसोटीचं कर्णधारपदही नाही, विराट ऐवजी या खेळाडूकडे धुरा? title=

मुंबई: टी 20 वर्ल्ड कपआधी विराट कोहलीने टी 20 फॉरमॅटचं कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली. त्यापाठोपाठ आता कसोटीचंही कर्णदारपद विराटकडून जाणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे. या आधी वन डे फॉरमॅटचं कर्णधारपदही विराटकडून जाऊ शकतं अशी एक चर्चा सोशल मीडियावर सुरू होती. न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात विराट कोहली कर्णधार नसेल असं सांगण्यात येत आहे. 

टी-20 वर्ल्ड कपमधून बाहेर पडल्यानंतर टीम इंडियाचे पुढचे लक्ष आता न्यूझीलंड विरुद्धच्या सीरिजवर आहे. 17 नोव्हेंबरपासून टीम इंडियाला घरच्या मैदानावर न्यूझीलंड विरुद्ध 3 सामन्यांची टी-20 सीरिज खेळायची आहे. 17 नोव्हेंबरपासून टी-20 मालिका सुरू होणार असून ती 21 नोव्हेंबरपर्यंत ती खेळण्यात येईल. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी-20 मालिकेनंतर 25 नोव्हेंबरपासून 2 सामन्यांची कसोटी मालिकाही खेळवली जाणार आहे.

या दिग्गज खेळाडूला मिळू शकतं कर्णधारपद?

एक-दोन दिवसांत कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाचा स्वाड जाहीर केला जाण्याची शक्यता आहे. पहिल्या कसोटी सामन्यासाठी विराट कोहली नाही तर दुसऱ्याच खेळाडूवर कर्णधारपदाची धुरा सोपवली जाण्याची शक्यता आहे. अजिंक्य रहाणे किंवा रोहित शर्माच्या खांद्यावर ही जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे. 

विराट कोहलीने BCCI ला 3 सामन्यांच्या टी-20 मालिकेव्यतिरिक्त पहिल्या कसोटीपासून विश्रांती मिळावी अशी विनंती केली. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि शार्दुल ठाकूर यांनाही पहिल्या कसोटीसाठी विश्रांती दिली जाण्याची शक्यता आहे. 

न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात विरोट कोहलीसोबत आणखी काही खेळाडूंना विश्रांती दिली जाऊ शकते असं सांगितलं जात आहे. येत्या दोन दिवसांत आणखी चित्र स्पष्ट होईल. शिवाय विकेटकीपर ऋषभ पंतलाही आराम दिला जाण्याची शक्यता आहे. तर ऋद्धीमान साहा किंवा के एस भरत यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. 

कसोटी सामन्याचे शेड्युल...

न्यूझीलंड विरुद्ध पहिला कसोटी सामना 25 नोव्हेंबर रोजी कानपूर इथे खेळवण्यात येणार आहे. दुसरा कसोटी सामना 3 डिसेंबरला मुंबईमध्ये खेळवण्यात येईल. दुसऱ्या कसोटी सामन्यात पुन्हा विराट कोहली खेळताना दिसू शकतो असंही सांगितलं जात आहे. आयपीएल आणि त्यापाठोपाठ टी 20 वर्ल्ड कप सामने झाल्याने विराट आणि त्यासोबत काही खेळाडूंना विश्रांती दिली जाण्याची शक्यता आहे. 

टीम इंडियाचं शेड्युल खूप जास्त बिझी आहे. न्यूझीलंड विरुद्ध सीरिजपाठोपाठ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जायचं आहे. तिथे 3 वन डे, 3 कसोटी आणि 4 टी 20 सामन्यांची सीरिज खेळवण्यात येणार आहे. 

भारत विरुद्ध न्यूझीलंड पूर्ण वेळापत्रक

17 नोव्हेंबर: पहिला T20I (जयपूर)
19 नोव्हेंबर: दुसरा T20I (रांची)
21 नोव्हेंबर: तिसरा T20 आंतरराष्ट्रीय (कोलकाता)
25 ते 29 नोव्हेंबर: पहिली कसोटी (कानपूर)
3 ते 7 डिसेंबर : दुसरा कसोटी सामना (मुंबई)