T20 वर्ल्डकप : MS Dhoniचा मास्टर प्लान या खेळाडूला राबवता येईल का?

जर तुम्ही क्रिकेटला फॉलो करत असाल तर तुम्हाला आठवत असेल की 2013च्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने रोहित शर्माला सलामीला उतरवम्याचा देण्याचा निर्णय घेतला होता. टॉप ऑर्डरमध्ये बढती मिळताच त्याचं आणि टीम इंडियाचं नशीब बदलले. सध्या अशीच एक खेळी न्यूझीलंड संघाचा कर्णधार केन विल्यमसनने आयसीसी टी-20 वर्ल्डकपमध्ये केली.

Updated: Nov 11, 2021, 03:38 PM IST
T20 वर्ल्डकप : MS Dhoniचा मास्टर प्लान या खेळाडूला राबवता येईल का? title=

मुंबई : जर तुम्ही क्रिकेटला फॉलो करत असाल तर तुम्हाला आठवत असेल की 2013च्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने रोहित शर्माला सलामीला उतरवम्याचा देण्याचा निर्णय घेतला होता. टॉप ऑर्डरमध्ये बढती मिळताच त्याचं आणि टीम इंडियाचं नशीब बदलले. सध्या अशीच एक खेळी न्यूझीलंड संघाचा कर्णधार केन विल्यमसनने आयसीसी टी-20 वर्ल्डकपमध्ये केली.

केन विल्यमसनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चौथ्या क्रमांकावर तर कधी पाचव्या किंवा सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करणार्‍या फलंदाजासह टूर्नामेंटची सुरुवात केली आहे. मात्र, या खास खेळाडूला बढती मिळताच तो संघासाठी उपयुक्त ठरू शकतो, हे सिद्ध झालंय. हा फलंदाज दुसरा तिसरा कोणी नसून डॅरिल मिशेल आहे. जो 2021च्या T-20 वर्ल्डकप स्पर्धेत मॅचविनर म्हणून समोर आलाय. विशेषतः उपांत्य फेरीच्या सामन्यात त्याने इंग्लंडविरुद्ध खेळलेली खेळी फार उत्तम होती.

T20 वर्ल्डकप 2021च्या उपांत्य फेरीच्या सामन्यात न्यूझीलंडने इंग्लंडसमोर 167 धावांचं आव्हान ठेवलं होतं. न्यूझीलंडला एकामागून एक धक्के बसत होते, पण डॅरिल मिशेल दुसऱ्या बाजूने तळ ठोकून उभा होता. मिशेलने 40 चेंडूत 46 धावा केल्या, पण पुढच्या सात चेंडूंत त्याने सामन्याचं रूपचं बदलून टाकलं. मिशेलने 47 चेंडूंत 4 चौकार आणि 4 सिक्सच्या मदतीने 72 धावा केल्या. 

या T-20 वर्ल्डकप असा एकही प्रसंग घडलेला नाही जेव्हा डॅरिल मिशेल दुहेरी आकडा पार करू शकला नसेल. त्याने पाकिस्तानविरुद्ध 27, भारताविरुद्ध 49, स्कॉटलंडविरुद्ध 13, नामिबियाविरुद्ध 19, अफगाणिस्तानविरुद्ध 17 आणि इंग्लंडविरुद्ध नाबाद 72 धावा केल्या आहेत.