नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट संघाची लढत कोणत्याही देशाशी असो, त्याच्यावर दडपण कधीच नसते. असलेच तर, काहीसे मैदानावर. कदाचीत म्हणूनच भारतीय खेळाडू अगदी अनोख्या शैलीत मैदानावर हटके एंट्री करत असावेत. सोशल मीडियावर एक व्हडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. ज्यात इग्लंड दौऱ्यावर असलेला भारतीय संघ मैदानात आपल्या हटके स्टाईलने प्रवेश करताना दिसतोय. खास करून, व्हिडिओत विराट कोहली आणि शिखर धवनची एंट्री पाहा.
इंग्लडच्या चेम्सफोर्ड मैदानावर खेळल्या गेलेल्या ड्रॉ प्रॅक्टीस सामन्यादरम्यानचा हा व्हिडिओ आहे. इथे सामन्याच्या तिसऱ्या दिवशी जेव्हा टीम इंडिया मैदानावर एंट्री घेत होता तेव्हा त्यांचे स्वागत पंजाबी ढोल वाजवून करण्यात आले. पंजाबी ढोल तर होते मात्र कमी होती ती भांगड्याची. ही कमी विराट कोहलीने भरून काढली. लगेचच पाठीमागून आलेल्या शिखर धवननेही त्याला साथ दिली. या दोन खेळाडूंचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Two @BCCI players have enjoyed their time at Chelmsford!
Well played, @imVkohli & @SDhawan25! #ESSvIND pic.twitter.com/Uz8W7p2xoh
— Essex Cricket (@EssexCricket) July 27, 2018
ही शानादर एंट्री घेतना विराट कोहली सर्वात पुढे होता. तो भांगडा करत पुढे निघून गेला. त्यानंतर पाठीमागे असलेल्या शिखर धवननेही ढोलाच्या तालावर भांगडा केला. या दोन खेळाडूंचा भांगडा पाहून ढोल वाजवणाऱ्यांच्या चेहऱ्यावरही एक वेगळाच आनंद पहायला मिळाला.
The two batters make their way to the ground with a traditional welcome by the locals.#ESSvIND pic.twitter.com/uqqPt9pOvl
— BCCI (@BCCI) July 26, 2018
दरम्यान, हा व्हिडिओ बीसीसीआयने आपल्या ट्विटर अकाऊंटवरही शेअर केला आहे.