मुरली विजयच्या नावावर नकोसं रेकॉर्ड

इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये भारतीय बॅट्समनची निराशाजनक कामगिरी सुरुच आहे. 

Updated: Aug 12, 2018, 06:25 PM IST
मुरली विजयच्या नावावर नकोसं रेकॉर्ड title=

लंडन : इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये भारतीय बॅट्समनची निराशाजनक कामगिरी सुरुच आहे. पहिल्या मॅचमध्ये १९४ रनचं आव्हान पूर्ण न करता आलेली भारतीय टीम दुसऱ्या मॅचच्या पहिल्या इनिंगमध्ये फक्त १०७ रनवर ऑल आऊट झाली. यानंतर दुसऱ्या इनिंगमध्येही भारतीय बॅट्समननी निराशा केली. सुरुवातीलाच भारताला दोन धक्के लागले. जेम्स अंडरसननं या दोन्ही विकेट घेतल्या. मुरली विजय दुसऱ्या इनिंगमध्येही शून्यवर आऊट झाला. अंडरसनच्या बॉलिंगवर बेअरस्टोनं मुरली विजयचा कॅच पकडला. याचबरोबर मुरली विजयनं नकोसा रेकॉर्ड स्वत:च्या नावावर केला आहे. एका टेस्टच्या दोन्ही इनिंगमध्ये मुरली विजय शून्यवर आऊट झाला आहे. पहिल्या इनिंगमध्येही जेम्स अंडरसननंच मुरली विजयची विकेट घेतली होती.

मुरली विजय पहिला भारतीय नाही

हे रेकॉर्ड करणारा मुरली विजय हा काही पहिला भारतीय बॅट्समन नाही. सगळ्यात पहिले १९५२ साली पंकज रॉय एकाच मॅचमध्ये दोन वेळा शून्यवर आऊट झाले होते. यानंतर १९७५ साली फारुक इंजिनिअर वेस्ट इंडिजविरुद्ध, वसीम जाफर २००७ साली बांगलादेशविरुद्ध, विरेंद्र सेहवाग २०११ साली इंग्लंडविरुद्ध, शिखर धवन २०१५ साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एका टेस्ट मॅचच्या दोन्ही इनिंगमध्ये शून्य रनवर आऊट झाले होते.