मॅच दरम्यान बेन स्टोक्सची खिलाडूवृत्ती, व्हिडिओ व्हायरल

इंग्लंडचा ऑल राऊंडर खेळाडू बेन स्टोक्सची खेळ भावना दिसून आली.

Updated: Sep 10, 2018, 01:23 PM IST
मॅच दरम्यान बेन स्टोक्सची खिलाडूवृत्ती, व्हिडिओ व्हायरल  title=

नवी दिल्ली : टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्या दरम्यान टेस्ट सिरीजची शेवटची मॅच सध्या मैदानात खेळली जात आहे. इंग्लंडने पहिल्या डावात 332 रन्स बनविले तर भारताच्या टीमने पहिल्या डावात 292 रन्स बनविले. आता इंग्लंडची टीम दूसरा डाव खेळत आहे. पहिल्या डावादरम्यान एका घटनेकडे साऱ्या स्टेडियमचं लक्ष गेलं आणि दिवसभर हा किस्साच सांगितला जातोय. या घटनेतून इंग्लंडचा ऑल राऊंडर खेळाडू बेन स्टोक्सची खेळ भावना दिसून आली. याचीच चर्चा आता सोशल मीडियामध्ये आहे.

भागीदारी

टीम इंडियाच्या पहिल्या डावासाठी लोकेश राहुल आणि शिखर धवन ओपनिंग करायला आले. धवन 3 रन्स बनवून आऊट झाला. धवनच्या आऊट झाल्यानंतर चेतेश्वर पुजारा बॅटींग करायला आला. पुजारा आणि राहुल यांच्यामध्ये चांगली भागीदारी झाली.

स्टोक्सचं कौतूक

बेन स्टोक्सच्या बॉलवर राहुल एक रन्स घ्यायला धावला तेव्हाच त्याच्या पायातील शूज निसटून खाली पडला. हे पाहताच बेन स्टोक्सने राहुलच्या पायातील शूज उचलला आणि राहुलला दिला. यानंतर सोशल मीडियावर याची चर्चा खूप झाली आणि स्टोक्सचं कौतूकही खूप करण्यात आलं.

37 रन्सची खेळी 

राहुलचा शूज पिच वर पडला खरा पण तो सुदैवाने स्टम्प लाइनवर पडला नाही. असं झालं असतं तर त्याला आऊट घोषित करण्यात आलं असतं. राहुलने भारताच्या पहिल्या डावात 53 बॉल्सचा सामना करत 4 फोरच्या मदतीने 37 रन्स बनविले. यानंतर सॅम कर्रनच्या बॉलवर तो आऊट झाला.