Ind vs Aus : ऋषभ पंतचं शतक हुकलं, भारतीय संघाकडे विजयाची संधी

भारतीय संघाकडे विजयाची संधी

Updated: Jan 11, 2021, 09:01 AM IST
Ind vs Aus : ऋषभ पंतचं शतक हुकलं, भारतीय संघाकडे विजयाची संधी title=

सिडनी : भारत आणि यजमान ऑस्ट्रेलिया यांच्यात चार सामन्यांच्या कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना सिडनी क्रिकेट मैदानावर खेळला जात आहे. सोमवारी 11 जानेवारी हा सामन्याचा शेवटचा दिवस आहे. आजही खेळ चालू आहे. बातमी लिहिण्यापर्यंत भारतीय संघाने  79.1 ओव्हरमध्ये 4 विकेट गमवत 250 रन केल्या आहेत. सध्या चेतेश्वर पुजारा आणि हनुमा विहारी क्रीजवर आहेत. त्याचबरोबर भारताला विजयासाठी आणखी 157 धावांची गरज आहे. 

ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 338 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल भारतीय संघ 244 धावा करु शकला. अशाप्रकारे ऑस्ट्रेलियाला 94 धावांची आघाडी मिळाली. ऑस्ट्रेलियाने दुसर्‍या डावात 312 धावा केल्या आणि डाव घोषित केला. अशाप्रकारे भारताला विजयासाठी 407 धावांचे लक्ष्य ठेवले.

आज अजिंक्य रहाणेच्या रुपात भारताला पहिला झटका लागला. तो 4 रनवर आऊट झाला. ऋषभ पंतने चेतेश्वर पुजारा सोबत चांगली पार्टनरशिप केली. पंतने पुजाराच्या आधी अर्धशतक पूर्ण केलं. पंतच्या चांगल्या खेळीमुळे भारतीय संघाच्या विजयाच्या आशा वाढल्या आहेत.

चेतेश्वर पुजाराने 170 बॉलमध्ये अर्धशतक ठोकले. यापूर्वी तो पहिल्या इनिंगमध्ये 50 धावांवर बाद झाला होता. 118 चेंडूत 97 धावा करणारा ऋषभ पंतच्या रूपात भारताला चौथा धक्का बसला. पॅट कमिन्सच्या हाती नॅथन लिऑनने त्याला झेलबाद केले. 12  फोर आणि 3 सिक्सच्या मदतीने त्याने 97 रनची चांगली खेळी केली आणि भारताला चांगल्या स्थितीत आणलं. पण ऋषभ पंतचं शतक थोड्यासाठी हुकलं आहे.