Ind vs aus: भारताच्या तक्रारीनंतर खेळ थांबला, ऑस्ट्रेलियन प्रेक्षकांना काढलं बाहेर

चौथ्या दिवशी अचानक खेळ मध्येच थांबला.

Updated: Jan 10, 2021, 10:43 AM IST
Ind vs aus: भारताच्या तक्रारीनंतर खेळ थांबला, ऑस्ट्रेलियन प्रेक्षकांना काढलं बाहेर title=

सिडनी : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिकेच्या तिसर्‍या कसोटी सामन्यात चौथ्या दिवशी अचानक खेळ मध्येच थांबला. मोहम्मद सिराजने तक्रार दिल्यानंतर खेळ थोडा थांबवावा लागला. ऑस्ट्रेलियाच्या प्रेक्षकांकडून चुकीच्या भाषेचा वापर होत असल्याची तक्रार केल्यानंतर 86 व्या ओव्हरमध्ये सामना थांबवण्यात आला होता.

सिराजने कर्णधार अजिंक्य रहाणेला याबाबत माहिती दिली. त्यानंतर दोघांनी पंच पॉल रायफलशी चर्चा केली. भारताने तिसऱ्या दिवशी ही खेळ संपल्यानंतर याबाबत तक्रार केली होती. आज पुन्हा सिराज बॉंड्री लाईनवर फिल्डींग करत असताना ऑस्ट्रेलियन प्रेक्षकांकडून चुकीच्या शब्दांचा वापर केला गेला. तक्रारीनंतर दोन्ही अंपायर यांच्यात चर्चा झाली. त्यानंतर मैदानावर उपस्थित सुरक्षा रक्षकांनी काही प्रेक्षकांना बाहेर काढलं आहे. त्यानंतर खेळ पुन्हा सुरु झाला.

ऑस्ट्रेलिया टीमने 87 ओव्हरमध्ये 5 विकेट गमावून 312 रन केले. ऑस्ट्रेलिया संघाकडे 406 रनची आघाडी झाली. त्यानंतर ऑस्ट्रेलिया संघाने इनिंगची घोषणा केली. भारतापुढे ऑस्ट्रेलियाने 407 रनचं आव्हान ठेवलं आहे.