नवी दिल्ली : टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्र सिंग दोनी याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्या नावावर आता आणखीन एक रेकॉर्ड केला आहे.
धोनीचं फिटनेसही खूपच चांगलं आहे आणि याचं उदाहरण प्रत्यक्ष मैदानात पहायला मिळतं. महेंद्रसिंग धोनी आजही क्रिकेटच्या मैदानात असा स्पीड पकडतो जसा एक २० वर्षांचा तरुण क्रिकेटरच.
महेंद्रसिंग धोनीने आपल्या जबरदस्त फिटनेसमुळेच एक रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान खेळण्यात आलेल्या दुसऱ्या टी-२० क्रिकेट मॅचमध्ये महेंद्रसिंग धोनीने दुसरा रन घेण्यासाठी इतक्या जोराने धाव घेतली की त्याच्या नावावर सर्वात वेगाने धावण्याचा रेकॉर्ड नोंद झाला आहे.
भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या टी-२० क्रिकेट मॅचमध्ये महेंद्रसिंग धोनीने दुसरा रन घेण्यासाठी ३१ किमी प्रति तास या वेगाने रन काढला.
Outrunning @msdhoni seems impossible! Catch the analysis on his ⚡️-quick runs on #NerolacCricketLive on Oct 13 on Star Sports. pic.twitter.com/rPbtbmsKES
— Star Sports (@StarSportsIndia) October 11, 2017
स्टार स्पोर्ट्सने पोस्ट केलेल्या या व्हिडिओत धोनी ३१ किमी प्रति तास या वेगाने धावत असल्याचं दिसत आहे. मात्र, या मॅचमध्ये धोनीला केवळ १३ रन्सच करता आले.