India vs Australia, 1st Test Weather Report : भारत - ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यात रंगणाऱ्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीला (Border-Gavaskar Trophy) नागपुरात येत्या 9 फेब्रूवारीपासून सुरूवात होणार आहे. त्यापूर्वी भारतावर विजय मिळवण्यासाठी ऑस्ट्रेलियन टीम बंगळुरुच्या मैदावात कसून सराव करत आहेत. अशातच भारत - ऑस्ट्रेलिया मालिकेसंदर्भात मोठी अपडेट आली आहे. टीम इंडियाचे नेतृत्व एकदिवसीय फॉर्मेटमध्ये रोहित शर्माकडे होते, तर अष्टपैलू हार्दिक पांड्याने टी-20 मध्ये संघाचे नेतृत्व केले होते. दोघांनीही आपापल्या नेतृत्वाखाली चमकदार कामगिरी करत संघाला विजयापर्यंत नेले. आता टीम इंडियाचे पुढील मिशन ऑस्ट्रेलियाला कसोटी मालिकेत पराभूत करण्याचे आहे. पण या सामन्याबाबत एक मोठी अपडेट समोर आलीय. (India vs Australia Border Gavaskar Trophy 1st test nagpur match cancelled big news weather report rohit sharma pat in marathi news)
नागपुरातील व्हीसीए स्टेडियमवर होणाऱ्या सामन्यात भारतीय संघ सलामीवीर रोहित शर्माच्या नेतृत्त्वात मैदानावर उतरणार आहे. तर ऑस्ट्रेलियन संघ हा पॅट कमिन्सच्या नेतृत्त्वात ही मालिका खेळणार आहे. या मालिकेतील पहिला सामना हा नागपूरमध्ये होणार असून पुढील सामने दिल्ली, धर्मशाला आणि अहमदाबादमध्ये होणार आहेत. या कसोटीनंतर तीन सामन्यांची एक दिवसीय मालिकाही खेळवली जाणार आहे. पण भारत ऑस्ट्रेलियादरम्यानचा पहिला सामना रद्द होण्याची शक्यता आहे.
नागपुरातील विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमच्या खेळपट्टीबद्दल बोलायचं झालं तर ही फास्ट बॉलरसाठी बेस्ट आहे. विशेष म्हणजे फास्ट बॉलरसाठी त्यांचा वेग वाढविण्यासाठी ही खेळपट्टी मदत करेल. मात्र, 2017 मध्ये या स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या शेवटच्या कसोटी सामन्यात फिरकीपटूंचे वर्चस्व पाहायला मिळाले. भारतीय संघातील फिरकीपटूंनी श्रीलंकेविरोधात 13 बळी घेतले होते. रविचंद्रन अश्विनने 8 तर रवींद्र जडेजाने 5 विकेट्स घेतल्या. भारताने हा सामना एक डाव आणि 239 धावांनी जिंकला होता. त्यामुळे ऑस्ट्रेलियन टीमने अश्विनचा ड्युप्लिकेट नेट्समध्ये बोलावला आहे. हा अश्विनचा डुप्लिकेट महिश पिठिया (Mahesh Pithiya) आहे, जो हूबेहूब अश्विनसारखीच बॉलिंग टाकतो.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच दिवसीय सामन्यात पावसामुळे व्यत्यय येण्याची शक्यता नाही. या मॅचदरम्यान कोणत्याही दिवशी हवामानाचा कोणताही अडथळा येणार नाही. अशा परिस्थितीत क्रिकेट चाहत्यांना या सामन्याचा पुरेपूर आनंद लुटता येणार आहे. हवामान खात्याने दिलेला माहितीनुसार पाच दिवसांत सरासरी तापमान 27 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.