IND vS AUS : दुसऱ्या वन डेसाठी टीम इंडिया नागपुरात दाखल

पाच वन डे मॅचच्या सीरिजमध्ये भारत १-० नं आघाडीवर

Updated: Mar 4, 2019, 01:01 PM IST
IND vS AUS : दुसऱ्या वन डेसाठी टीम इंडिया नागपुरात दाखल  title=

नागपूर : भारतीय क्रिकेट टीम ५ मार्च रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसरी वन डे मॅच खेळणार आहे. ही मॅच नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये खेळली जाईल. दोन्ही टीम या मॅचसाठी नागपुरात दाखल झाल्या आहेत. सोशल मीडियावर जारी करण्यात आलेल्या एका व्हिडिओत टीम इंडियाचे खेळाडू हॉटेल गेटवर बसमधून उतरताना दिसत आहेत. 



View this post on Instagram


Hello Nagpur - #TeamIndia arrive for the 2nd ODI against Australia #INDvAUS @paytm

A post shared by Team India (@indiancricketteam) on

यापूर्वी हैदराबादच्या राजीव गांधी क्रिकेट स्टेडियममध्ये खेळण्यात आलेल्या पहिल्या वन डे मॅचमध्ये यजमान टीम इंडियानं पाहुण्या ऑस्ट्रेलिया टीमला पछाडत पाच वन डे मॅचच्या सीरिजमध्ये १-० नं आघाडी घेतलीय.

या मॅचच्या पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत ऑस्ट्रेलियानं ७ विकेट गमावत २३६ रन्सचा स्कोअर उभारला. या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियानं ४ विकेट गमावत ४८.२ ओव्हरमध्ये २४० रन्स ठोकले. या मॅचमध्ये ८१ रन्स ठोकणाऱ्या केदार जाधव याची 'मॅन ऑफ द मॅच' म्हणून निवड करण्यात आली.

उल्लेखनीय म्हणजे, ३० मे पासून इंग्लंडमध्ये सुरू होणाऱ्या वनडे विश्वचषकापूर्वी भारताची ही शेवटची सीरिज आहे. त्यामुळे टीम इंडियासाठी ही सीरिज महत्त्वाची आहे.