INDvsENG Women : भारताला विजयासाठी १६१ रनचे आव्हान

भारताची नियमित कॅप्टन हरमनप्रीत कौर दुखापतग्रस्त असल्याने नेतृत्वाची धुरा स्मृती मांधनाकडे सोपवण्यात आली आहे.

Updated: Mar 4, 2019, 12:37 PM IST
INDvsENG Women : भारताला विजयासाठी १६१ रनचे आव्हान title=

गुवाहाटी : इंग्लंडने भारताला विजयासाठी १६१ रनचे लक्ष दिले आहे. इंग्लंडने २० ओव्हरमध्ये ४ विकेटच्या मोबदल्यात १६० रन केले. इंग्लंडची सुरुवात चांगली झाली. इंग्लंडच्या डॅनिएल वॅट आणि टॅमी ब्युमाट या दोघांनी इंग्लंडला चांगली  सुरुवात दिली. या दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी ८९ रनची पार्टनरशिप झाली. डॅनिएल वॅट इग्लंडचा स्कोअर ८९ असताना ३५ रन करुन आऊट झाली. यानंतर आलेल्या नताली शिव्हर देखील ४ रन करुन आऊट झाली. टॅमी ब्युमाट आणि  हीदर नाईटच्या जोडीने इंग्लंडचा डाव सावरला. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी ५९ रनची पार्टनरशिप केली. या दोघांनी केलेल्या खेळीमुळे इंग्लंडला भारताला १६१ रनचे आव्हान देता आले.   

इंग्लंडकडून टॅमी ब्युमाटने सर्वाधिक ६२ रन काढल्या. त्यासोबत कॅप्टन हीदर नाइटने ४० रनची महत्वपूर्ण खेळी केली. तसेच डॅनिएल वॅटने देखील ३५ रन करत उत्तम साथ दिली. भारताकडून सर्वाधिक २ विकेट राधा यादवने घेतल्या. तर दीप्ती शर्मा आणि शिखा पांडे यांनी प्रत्येकी १ विकेट घेत चांगली साथ दिली.

भारताची नियमित कॅप्टन दुखापतग्रस्त असल्याने नेतृत्वाची धुरा स्मृती मांधनाकडे सोपवण्यात आली आहे.

भारतीय टीम :जेमिमा रॉड्रिग्ज, वेदा कृष्णामूर्ती, शिखा पांडे, स्मृति मंधाना (कॅप्टन), पूनम यादव, मिताली राज, तानिया भाटिया (विकेटकीपर), हर्लिन देओल, अरुंधती रेड्डी, दीप्ती शर्मा, राधा यादव.

इंग्लंड टीम : लिन्से स्मिथ, लॉरेन विनफिल्ड, सोफी डंकली ब्राउन, कॅथरिन ब्रंट, हीदर नाइट (कॅप्टन), डॅनिएल वॅट, अन्या श्रुबसोल, नताली शिव्हर, एलेक्स हार्टले, केट क्रॉस, टॅमी ब्युमाँट