India Tour Sri Lanka | टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका यांच्यातील वनडे सीरिजला कोरोनाचा फटका

टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका यांच्यातील वनडे सीरिजला 13 जुलैपासून सुरुवात होणार होती. 

Updated: Jul 9, 2021, 10:37 PM IST
India Tour Sri Lanka | टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका यांच्यातील वनडे सीरिजला कोरोनाचा फटका title=

कोलंबो :  विराट कोहली आणि रोहित शर्मा या दिग्गज खेळाडूंच्या अनुपस्थितीत टीम इंडियाची बी टीम श्रीलंका दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात टीम इंडियाच्या नेतृत्वाची जबाबदारी ही 'गब्बर' शिखर धवनवर देण्यात आली आहे. या दौऱ्यात टीम इंडिया श्रीलंके विरुद्ध वनडे आण टी 20 सीरिज खेळणार आहे. या सीरिजला 13 जुलैपासून सुरुवात होणार आहे. त्याआधी या एकदिवसीय मालिकेलाही कोरोनाचा फटका बसला आहे. श्रीलंकेच्या गोटातील काही जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे 13 जुलैपासून सुरु होणाऱ्या एकदिवसीय मालिकेला काही दिवस उशीरा होणार असल्याची माहिती बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी एएनआयला दिली आहे. (india tour sri lanka 2021 odi series to be rescheduled in the wake of COVID 19 case in sri lanka team) 

श्रीलंकेचे बॅटिंग कोच  ग्रांट फ्लॉवर  यांना कोरोनाची लागण झाली. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने याबाबतची माहिती दिली आहे. ग्रांट फ्लॉवर नुकतेच इंग्लंड दौऱ्यावरुन परतले आहेत. त्यानंतर त्यांनी कोरोना चाचणी केली. यामध्ये त्यांचा रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आला आहे. त्यांमुळे त्यांना खेळाडूंपासून स्वतंत्र ठेवण्यात आले आहे. ग्रांट फ्लॉवर यांना कोरोनाची साधारण लक्षणं आहेत. तरीही खबरदारीचा उपाय म्हणून इतर खेळाडूंचीही कोरोना चाचणी करण्यात आल्याची माहिती श्रीलंका क्रिकेट बोर्डाने ट्विटद्वारे दिली आहे.

त्यामुळे या वनडे मालिकेला 13 ऐवजी 17 जुलैला  सुरुवात होणार असल्याची शक्यता गांगुलीने वर्तवली आहे. पहिला सामना उशीरा सुरु होणार असल्याने याचा थेट परिणाम हा टी 20 मालिकेवरही होणार आहे.    

श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडिया

शिखर धवन (कॅप्टन), भुवनेश्वर कुमार, पृथ्वी शॉ, देवदत्त पडिक्कल, रुतुराज गायकवाड़, सूर्यकुमार यादव, मनीष पांडे, हार्दिक पंड्या, नीतीश राणा, इशान किशन, संजू सॅमसन, युजवेंद्र चहल, राहुल चाहर, कृष्णप्पा गौतम, क्रुणाल पंड्या, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, दीपक चाहर, नवदीप सैनी आणि चेतन सकारिया.