पुरूष हॉकी विश्वकप २०२३ स्पर्धेचं यजमानपद भारताकडे

भारताला चौथ्यांदा यजमानपद

Updated: Nov 10, 2019, 02:53 PM IST
पुरूष हॉकी विश्वकप २०२३ स्पर्धेचं यजमानपद भारताकडे title=

नवी दिल्ली : पुरूष हॉकी विश्वकप स्पर्धेचं यजमानपद भारताकडे आलं आहे. २०२३ साली होणारी ही स्पर्धा भारतात होणार आहे. इंटरनॅशनल हॉकी फेडरेशननं याबाबत बैठक घेतली. बैठकीत यजमानपद भारताला देण्याचा निर्णय झाला आहे. पुरूष जागतिक वर्ल्डकप हॉकी स्पर्धा २०१८ नंतर ५ वर्षांनंतर पुन्हा भारतात होते आहे. तर या स्पर्धेसाठी भारतानं सलग दुसऱ्यांदा यजमानपद मिळवलं आहे. भारतासह आणखी ३ देशांनी यजमानपद मागितलं होतं. पुरुष हॉकी विश्वकप स्पर्धा १३ ते २९ जानेवारी दरम्यान खेळली जाणार आहे. १९७१ नंतर चौथ्यांदा भारताला यजमानपद मिळालं आहे.

२०२२ मध्ये होणाऱ्या एफआयएच महिला हॉकी वर्ल्डकपचं आयोजन स्पेन आणि नेदरलँडमध्ये होणार आहे. महिला हॉकी वर्ल्डकप १ ते १७ जुलै २०२२ पर्यंत चालणार आहे.

भारताने १९८२ मध्ये मुंबई, २०१० मध्ये दिल्ली आणि २०१८ मध्ये भुवनेश्वर मध्ये हॉकी स्पर्धेचं आयोजन केलं होतं. २०२३ मध्ये भारताला स्वतंत्र होऊन ७५ वर्ष पूर्ण होणार आहेत. त्यासाठी हे यजमानपद भारतासाठी खास ठरणार आहे. भारताने हॉकी विश्वकप १९७५ मध्ये जिंकला होता. भारताशिवाय हॉलंडने तीन वेळा पुरूष हॉकी विश्वकपमचं यजमानपद भूषवलं आहे.