थोड्याच वेळात भारताचा आयर्लंडशी सामना

भारत आणि आयर्लंडमध्ये आजपासून टी-२० क्रिकेट मालिका सुरु होत आहे. डबलिन इथं पहिली लढत रंगणार आहे. तब्बल अकरा वर्षांनंतर भारतीय क्रिकेट संघ इथं सामना खेळणार आहे. सध्याच्या संघातील केवळ दिनेश कार्तिक अकरावर्षांपूर्वी राहुल द्रविडच्या नेतृत्त्वाखाली इथं खेळला आहे. भारत आणि आयर्लंड दरम्यान यापूर्वी २००९मध्ये टी-२० लढत झाली होती.

Updated: Jun 27, 2018, 06:08 PM IST
थोड्याच वेळात भारताचा आयर्लंडशी सामना  title=

डबलिन : भारत आणि आयर्लंडमध्ये आजपासून टी-२० क्रिकेट मालिका सुरु होत आहे. डबलिन इथं पहिली लढत रंगणार आहे. तब्बल अकरा वर्षांनंतर भारतीय क्रिकेट संघ इथं सामना खेळणार आहे. सध्याच्या संघातील केवळ दिनेश कार्तिक अकरावर्षांपूर्वी राहुल द्रविडच्या नेतृत्त्वाखाली इथं खेळला आहे. भारत आणि आयर्लंड दरम्यान यापूर्वी २००९मध्ये टी-२० लढत झाली होती.

त्यावेळी भारतानं बाजी मारली होती. सुरेश रैनानं संघात कमबॅक केलं असून त्याला आपली उपयुक्तता सिद्ध करावी लागणार आहे. चौथ्या स्थानासाठी रैना आणि के.एल.राहुलमध्ये चुरस असेल. तर आयर्लंड संघात सिमि सिंग हा भारतीय वंशाचा अष्टपैलू खेळाडू आहे. तर स्कॉटलंडविरुद्ध विश्रांती देण्यात आलेला विलियम पोर्टफिल्ड या मालिकेत कमबॅक करण्याची शक्यता आहे. भारत आणि आयर्लंडमध्ये डबलिन इथं आज रात्री साडेआठ वाजता सामना सुरु होईल.

या दौऱ्यावर भारतीय संघ आयर्लंडविरुद्ध दोन टी-२०, इंग्लंडविरुद्ध तीन टी-२०, तीन एकदिवसीय आणि पाच कसोटी मालिका खेळणार आहे.