Hardik Pandya Captaincy : तेल गेले तूप गेले हाती आलं धुपाटणं, ही म्हण तुमच्याही कानावर आली असेल. मात्र, तुम्हाला माहितीये का? ही म्हण एका खेळाडूवर आज बरोबर लागू होतीये... त्याचं नाव हार्दिक पांड्या... होय, तोच हार्दिक पांड्या ज्याने टीम इंडियाला टी-ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकवून दिलाय. बीसीसीआयने श्रीलंका दौऱ्यासाठी टी-ट्वेंटी संघाची (India T20I Squad for Sri Lanka tour) घोषणा केली. यावेळी रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर टीम इंडियाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव याला कॅप्टन्सी देण्यात आलीये. मात्र, हार्दिक पांड्याला साधी व्हाईस कॅप्टन्सी देखील देण्यात आली नाही. त्यामुळे आता पांड्याला मोठा धक्का बसला आहे.
टी-ट्वेंटी मालिकेसाठी हार्दिक पांड्याला कॅप्टन्सी दिली नाही अन् व्हाईस कॅप्टन्सी देखील दिली गेली नाही. तर वनडे मालिकेत देखील हार्दिक पांड्याला नारळ मिळालाय. वनडे मालिकेत रोहित शर्मा कॅप्टन असेल, तर शुभमन गिल व्हाईस कॅप्टन असणार आहे. शुभमन गिल याला दोन्ही मालिकेत व्हाईस कॅप्टन्सी देण्यात आलीये. त्यामुळे हार्दिक पांड्या आणि केएल राहुल यांच्या चर्चांना पूर्णविराम लागलाय.
श्रीलंका दौऱ्यासाठी संघ जाहीर करताना बीसीसीआयने खेळाडूंना इशारा दिला आहे. बीसीसीआय आगामी देशांतर्गत क्रिकेट हंगाम 2024-25 मध्ये खेळाडूंची उपलब्धता आणि सहभागावर लक्ष ठेवणे सुरू ठेवेल, असं बीसीसीआयने स्पष्टपणे सांगितलं आहे. हार्दिक पांड्या देशांतर्गत क्रिकेट खेळत नसल्याने बीसीसीआयने त्याला धडा शिकवलाय का? असा सवाल विचारला जाऊ लागला आहे. तसेच बीसीसीआयने श्रेयस अय्यरला वनडे संघात संधी दिली असली तरी इशान किशनला अजून वाट पहावी लागणार आहे.
टी-ट्वेंटी मालिकेसाठी टीम इंडियाचा संघ - सूर्यकुमार यादव (C), शुबमन गिल (VC), यशस्वी जयस्वाल, रिंकू सिंग, रियान पराग, ऋषभ पंत (WK), संजू सॅमसन (WK), हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोनी, अर्शदीप सिंग, खलील अहमद आणि मोहम्मद सिराज.
वनडे मालिकेसाठी टीम इंडियाचा संघ - रोहित शर्मा (C), शुभमन गिल (VC), विराट कोहली, केएल राहुल (WK), ऋषभ पंत (WK), श्रेयस अय्यर, शिवम दुबे, कुलदीप यादव, मोहम्मद. सिराज, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, रियान पराग, अक्षर पटेल, खलील अहमद, हर्षित राणा.