IND VS NZ Test : रोहित शर्माचा वारसदार अन् कसोटी संघाचा नवा कर्णधार सापडला? BCCI कडून सूचक संकेत

IND VS NZ Test : काही आठवड्यांपूर्वीच बांगलादेशविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये 2-0 असं निर्भेळ यश मिळवणाऱ्या भारतीय संघामध्ये केवळ एक बदल करण्यात आला आहे. तर रोहित शर्मानंतर टेस्ट टीमचा कर्णधार कोण असेल याविषयी देखील बीसीसीआयने टीम जाहीर करताना सूचक संकेत दिले. 

पुजा पवार | Updated: Oct 12, 2024, 10:27 AM IST
IND VS NZ Test : रोहित शर्माचा वारसदार अन् कसोटी संघाचा नवा कर्णधार सापडला? BCCI कडून सूचक संकेत title=
(Photo Credit : Social Media)

India VS New Zealand Test :  टेस्ट आणि टी 20 सीरिजमध्ये बांगलादेशला धूळ चारल्यावर आता टीम इंडिया न्यूझीलंड विरुद्ध तीन सामान्यांची टेस्ट सीरिज खेळण्यासाठी सज्ज झाली आहे. बीसीसीआयने शुक्रवारी रात्री उशीरा न्यूझीलंड विरुद्ध पहिल्या टेस्टसाठी टीम इंडियाची घोषणा केली. काही आठवड्यांपूर्वीच बांगलादेशविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये 2-0 असं निर्भेळ यश मिळवणाऱ्या भारतीय संघामध्ये केवळ एक बदल करण्यात आला आहे. तर रोहित शर्मानंतर टेस्ट टीमचा कर्णधार कोण असेल याविषयी देखील बीसीसीआयने टीम जाहीर करताना सूचक संकेत दिले. 

कधी पार पडणार भारत- न्यूझीलंड सीरिज?

न्यूझीलंड संघ लवकरच भारत दौऱ्यावर येणार असून येथे ते भारताविरुद्ध तीन सामन्यांची टेस्ट सीरिज आणि तेवढ्याच सामन्यांची टी 20 सीरिज खेळणार आहेत. 16 ते 20 ऑक्टोबर रोजी भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात पहिला टेस्ट सामना एम. चेन्नास्वामी स्टेडियम येथे खेळवला जाणार आहे. तर दुसरा सामना 24 ते 28 ऑक्टोबर दरम्यान दुसरा टेस्ट सामना हा महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, पुणे येथे होईल. तसेच तिसरा आणि शेवटचा टेस्ट सामना हा 1 नोव्हेंबर ते 5 नोव्हेंबर दरम्यान वानखेडे स्टेडियम, मुंबई येथे खेळवला जाईल. 

हेही वाचा  : भारताच्या आणखी एका क्रिकेटरला सरकारी नोकरी, मोहम्मद सिराज झाला तेलंगणाचा DSP

 

कसोटी संघाचा नवा कर्णधार सापडला?

बीसीसीआयने भारतीय संघ जाहीर करताना बांगलादेशविरुद्धच्या नुकतीच टेस्ट सीरिज खेळलेल्याच खेळाडूंना पुन्हा एकदा न्यूझीलंड विरुद्ध भारतीय टेस्ट संघात स्थान दिले आहे. यातून केवळ गोलंदाज यश दयालला वगळण्यात आलं असून त्याऐवजी प्रसिद्ध कृष्णाला संधी देण्यात आली आहे. तर बीसीसीआयने न्यूझीलंड टेस्टसाठी भारतीय संघाचा उपकर्णधार म्हणून जसप्रीत बुमराहचं नाव जाहीर केलंय. 

बांगलादेश विरुद्ध टेस्ट सीरिजसाठी बीसीसीआयने टीम इंडियाचा उपकर्णधार जाहीर केला नव्हता, परंतू न्यूझीलंड टेस्ट दरम्यान रोहित शर्मा काही सामन्यात अनुपस्थित राहिला तर त्याच्या ऐवजी जसप्रीत बुमराह हा टीम इंडियाचं नेतृत्व करेल. रोहित वैयक्तिक कारणांमुळे ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणाऱ्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचे काही सामने खेळणार नाही अशा बातम्या बीसीसीआय सूत्रांच्या हवाल्याने मीडियात देण्यात आल्या होत्या. तसेच टी २० क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यावर रोहित वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपनंतर टेस्ट क्रिकेटमधूनही निवृत्ती घेईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. तेव्हा रोहितनंतर बुमराह हा भारताच्या टेस्ट संघाचा कर्णधार म्हणून पुढे येऊ शकतो. हाच विचार करून बीसीसीआयने जसप्रीत बुमराहला न्यूझीलंड टेस्टसाठी भारतीय संघाचा उपकर्णधार म्हणून जाहीर केलं असल्याचं बोललं जातं आहे. 

असा असेल न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठीचा भारतीय संघ : 

रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयसवाल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सर्फराज खान, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव , मोहम्मद सिराज, आकाश दीप

राखीव खेळाडू -  हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी, मयंक यादव आणि प्रसिद्ध कृष्णा