कुलदीप यादवच्या फिरकीपुढे इंग्लंडचं पुन्हा लोटांगण

कुलदीप यादवच्या फिरकी बॉलिंगपुढे इंग्लंडच्या बॅट्समननी पुन्हा लोटांगण घातलं.

Updated: Jul 12, 2018, 08:52 PM IST
कुलदीप यादवच्या फिरकीपुढे इंग्लंडचं पुन्हा लोटांगण title=

नोटिंगहम : कुलदीप यादवच्या फिरकी बॉलिंगपुढे इंग्लंडच्या बॅट्समननी पुन्हा लोटांगण घातलं. ४९.५ ओव्हरमध्येच इंग्लंडची टीम २६८ रनवर ऑल आऊट झाली. कुलदीप यादवनं १० ओव्हरमध्ये फक्त २५ रन देऊन इंग्लंडच्या ६ विकेट घेतल्या. तर उमेश यादवला २ विकेट, युझवेंद्र चहलला १ विकेट मिळाली आणि एक खेळाडू रन आऊट झाला. या मॅचमध्ये भारतानं टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला. यानंतर बॅटिंगला आलेल्या इंग्लंडनं चांगली सुरुवात केली. १० ओव्हरमध्येच इंग्लंडचा स्कोअर ७० रनपेक्षा जास्त होता. पण कुलदीप यादव बॉलिंगला आल्यावर इंग्लंडला धक्के द्यायला सुरुवात केली. आणि इंग्लंडचा डाव सावरलाच नाही. इंग्लंडकडून जॉस बटलरनं ५१ बॉलमध्ये सर्वाधिक ५३ रनची खेळी केली. तर बेन स्टोक्सनं १०३ बॉलमध्ये ५० रन केल्या. ओपनिंगला आलेल्या जेसन रॉय आणि जॉनी बेअरस्टोनं प्रत्येकी ३८ रन केल्या.

३ वनडे मॅचच्या या सीरिजची पहिली मॅच नोटिंगहमच्या ट्रेन्ट ब्रिजमध्ये खेळवण्यात येत आहे. २६९ रनचा पाठलाग करून सीरिजमध्ये १-०नं आघाडी मिळवण्याची संधी भारताला आहे. 

लाईव्ह स्कोअर पाहण्यासाठी क्लिक करा