सीरिज जिंकण्यासाठी भारताला २१६ रन्सची आवश्यकता

भारताविरुद्धच्या तिसऱ्या आणि शेवटच्या वनडेमध्ये श्रीलंकेचा संघ ४४.५ ओव्हर्समध्येच २१५ रन्सवर ऑल आऊट झाला.

Shreyas deshpande श्रेयस देशपांडे | Updated: Dec 17, 2017, 06:18 PM IST
सीरिज जिंकण्यासाठी भारताला २१६ रन्सची आवश्यकता  title=

विशाखापट्टणम : भारताविरुद्धच्या तिसऱ्या आणि शेवटच्या वनडेमध्ये श्रीलंकेचा संघ ४४.५ ओव्हर्समध्येच २१५ रन्सवर ऑल आऊट झाला. भारताच्या कुलदीप यादव आणि युझुवेंद्र चहलनं प्रत्येकी ३ विकेट घेतल्या. तर हार्दिक पांड्याला २ आणि भुवनेश्वर कुमार-जसप्रीत बुमराहला प्रत्येकी एक विकेट मिळाली. श्रीलंकेच्या उपुल थरंगानं सर्वाधिक ९५ रन्स बनवले.

श्रीलंकेनं ठेवलेल्या २१६ रन्सचा पाठलाग करताना भारतानं रोहित शर्माच्या रुपात एक विकेट गमावली आहे. शिखर धवन आणि श्रेयस अय्यर सध्या खेळत आहेत. ही मॅच जिंकली तर भारत टेस्ट सीरिजपाठोपाठ वनडे सीरिजवरही कब्जा करेल. धर्मशालामध्ये झालेली पहिली वनडे हारल्यानंतर मोहालीतली दुसरी वनडे भारत जिंकला होता.

लाईव्ह स्कोअरबोर्ड पाहण्यासाठी क्लिक करा