India New T20 Coach: भारतीय संघाचे सध्याचे प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांना टी-20 विश्वचषकात संघाच्या खराब कामगिरीनंतर टीकेला सामोरे जावे लागले होते. या पराभवानंतर राहुल द्रविड हे भारताच्या संघाबाहेर असल्याचे समोर येत आहे. पण जर द्रविड संघात नसतील तर भारताचे प्रशिक्षकपद (team India Coach) कोण सांभाळणार, हा प्रश्न बऱ्याच जणांना पडलेला होता. पण आता हा प्रश्न बीसीसीआय (BCCI) सोडवण्याच्या मार्गावर आहे. टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या जागी भारताकडे असे 3 पर्याय आहेत, ज्यांना लवकरात लवकर भारतीय संघाचे नवीन प्रशिक्षक बनवले जाऊ शकते.
महेंद्रसिंग धोनी
टीम इंडियाचा सर्वात अनुभवी खेळाडू महेंद्रसिंग धोनीला (MS Dhoni) टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक बनताना पाहण्याची प्रत्येकाची इच्छा आहे. टी-20 विश्वचषक 2021 मध्ये टीम इंडियाचा मार्गदर्शक म्हणून महेंद्रसिंग धोनीच्या नावाची घोषणा करण्यात आली. द्रविडच्या जागी धोनी टीम इंडियाचा (Team India) पुढचा प्रशिक्षक झाला, तर तो भारतीय संघाचे नशीब बदलेल. धोनीला वर्ल्ड कपसारख्या स्पर्धा कशा जिंकायच्या हे माहीत आहे. 2023 चा वन डे वर्ल्ड कप पुढील वर्षी भारतात होणार आहे आणि तो लक्षात घेता टीम इंडियाला धोनीची प्रशिक्षक म्हणून गरज आहे. महेंद्रसिंग धोनीने 15 ऑगस्ट 2020 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.
वाचा : टीम इंडियाच्या पराभवाला 'हा' युवा खेळाडू ठरला कारणीभूत?
वीरेंद्र सेहवाग
भारताचा माजी स्फोटक सलामीवीर वीरेंद्र सेहवागही (Virender Sehwag) टीम इंडियाचा पुढील प्रशिक्षक होण्याचा दावेदार आहे. वीरेंद्र सेहवाग जेवढा आक्रमक फलंदाजीत होता, तेवढाच आक्रमक प्रशिक्षकाच्या बाबतीतही त्याच्याकडून अपेक्षित आहे. यासाठी त्यांनी बीसीसीआयच्या निवड प्रक्रियेअंतर्गत अनेकवेळा अर्ज केला आहे. रवी शास्त्री यांच्या काळापासून सेहवाग टीम इंडियाचा प्रशिक्षक होण्यासाठी प्रयत्न करत आहे. मात्र रवी शास्त्री आणि राहुल द्रविडमुळे त्याला संधी मिळू शकली नाही.
माईक हेसन
न्यूझीलंडचे माजी प्रशिक्षक माइक हेसन (Mike Hesson) हे आयपीएल संघ रॉयल चॅलेंजर्स (Royal Challengers) बंगळुरूचे संचालक आहेत. माइक हसन 2012 मध्ये प्रशिक्षक बनले आणि संघाने 2015 एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. त्याचबरोबर टीम इंडियाचा स्टार बॅट्समन विराट कोहलीही माइक हसनच्या कोचिंग स्किल्सबद्दल जागरूक आहे. अशा परिस्थितीत राहुल द्रविडनंतर बीसीसीआय टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकासाठी हेसनच्या नावावर विचार करू शकते. माईक हेसन हे आयपीएलमधील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे संचालन संचालक आहेत.