IND vs BAN : टीम इंडियाच्या पराभवाला 'हा' युवा खेळाडू ठरला कारणीभूत?

IND vs BAN : टीम इंडिया आता बुधवार 7 डिसेंबर रोजी बांगलादेश विरुद्ध दुसरी वनडे खेळणार आहे. या दुसऱ्या वनडे सामन्यात त्याला बेंचवर बसवले जाण्याची शक्यता आहे. त्याच्या जागी उमरान मलिक (Umran Malik) प्लेइंग इलेव्हनमध्ये परत येऊ शकतो.  

Updated: Dec 5, 2022, 01:56 PM IST
IND vs BAN : टीम इंडियाच्या पराभवाला 'हा' युवा खेळाडू ठरला कारणीभूत? title=

IND vs BAN : बांगलादेश विरूद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात टीम इंडियाचा (Team India vs Bangladesh) 1 विकेटने पराभव झाला. टीम इंडियाच्या हाता तोंडातला विजय बांगलादेशने हिसकावला होता. टीम इंडियाच्या पराभवाची अनेक कारणे आहेत, तर अनेक खेळाडू देखील याला जबाबदार आहेत. यामध्ये अनुभवी के एल राहूल, वॉशिग्टन सुंदर आणि एका युवा खेळाडूच नाव देखील समोर आले आहे. हा खेळाडू कोण आहे तो जाणून घेऊयात. 

कोण आहे हा खेळाडू?

बांगलादेशविरुद्धच्या (Bangladesh) पहिल्या वनडे सामन्यात टीम इंडियाचा (Team India) कर्णधार रोहित शर्माने वेगवान गोलंदाज कुलदीप सेनला मोठ्या आत्मविश्वासाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी दिली होती. उमरान मलिकसारख्या वेगवान गोलंदाजाला बाहेर बसवून कुलदीप सेनला (Kuldeep Sen) पदार्पणाची संधी देण्यात आली होती. पण या संधीच त्याला सोन करता आले नाही, आणि तो फ्लॉप ठरला होता, असे अनेक क्रिकेट फॅन्सचे म्हणणे आहे. 

पहिल्या सामन्यातील कामगिरी 

बांगलादेशविरुद्धच्या (Bangladesh) पहिल्या वनडेत कुलदीप सेनने (Kuldeep Sen) केवळ 5 ओव्हरमध्ये 37 धावा दिल्या. कुलदीप सेनला 2 विकेट मिळाल्या तरीही त्याने 7.40 च्या इकॉनॉमी रेटने धावा दिल्या. वनडे क्रिकेटमध्ये 7.40 चा इकॉनॉमी रेटने धावा देणे अत्यंत खराब कामगिरी मानला जाती. त्यामुळे तो टीम इंडियासाठी संकटमोचक ठरू शकला नाही. आणि टीम इंडियाच्या बांगलादेश विरूद्धच्या पराभवास तो कारणीभूत ठरला आहे.

बांगलादेशविरुद्ध (Bangladesh) खेळल्या गेलेल्या पहिल्या वनडे सामन्यात टीम इंडियाच्या पराभवाचे सर्वात मोठे कारण कुलदीप सेन (Kuldeep Sen) ठरला आहे. उमरान मलिकच्या जागी त्याला संधी दिली होती. पण त्याला या संधीचा फायदा उचलता आला नाही. तसेच टीम इंडियामध्ये संधी मिळणे इतके सोपे नाही आणि एखाद्या खेळाडूने संधी वाया घालवली तर त्याच्यासाठी भारतीय संघाचे दरवाजेही बंद होतात. त्यामुळे टीम इंडियात कुलदीप सेनची (Kuldeep Sen) कारकीर्द सुरू होण्यापूर्वीच संकटात सापडली आहे. 

दरम्यान टीम इंडिया आता बुधवार 7 डिसेंबर रोजी बांगलादेश विरुद्ध दुसरी वनडे खेळणार आहे. या दुसऱ्या वनडे सामन्यात त्याला बेंचवर बसवले जाण्याची शक्यता आहे. त्याच्या जागी उमरान मलिक (Umran Malik) प्लेइंग इलेव्हनमध्ये परत येऊ शकतो.