भारतासमोर विजयासाठी २१७ धावांचे आव्हान

भारताविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात श्रीलंकेचा डाव २१६ धावांत आटोपलाय. भारताने केलेल्या भेदक गोलंदाजीमुळे श्रीलंकेला पहिल्या वनडेत ५० षटकेही पूर्ण खेळता आली नाही. 

Updated: Aug 20, 2017, 05:51 PM IST
भारतासमोर विजयासाठी २१७ धावांचे आव्हान title=

दाम्बुला : भारताविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात श्रीलंकेचा डाव २१६ धावांत आटोपलाय. भारताने केलेल्या भेदक गोलंदाजीमुळे श्रीलंकेला पहिल्या वनडेत ५० षटकेही पूर्ण खेळता आली नाही. 

अक्षर पटेलच्या ३ विकेट, केदार जाधव, जसप्रीत बुमराह आणि युझवेंद्र चहलने मिळवलेले प्रत्येकी दोन बळी यामुळे भारताने श्रीलंकेला ४३.२ षटकांत २१६ धावांत रोखले. भारतासमोर विजयासाठी २१७ धावांचे आव्हान आहे. 

लाईव्ह स्कोर पाहण्यासाठी क्लिक करा

श्रीलंकेचा सलामीन निरोशन डिकेवालाने सर्वाधिक ६४ धावांची खेळी केली. तर कुशल मेंडिसने ३६ धावा केल्या. दनुष्का गुंथिलकाने ३५ धावा केल्या. श्रीलंकेचे इतर फलंदाज मात्र सपशेल अपयशी ठरले.