नवी दिल्ली : सोशल मीडियावरील चिमुरडीचा व्हायरल झालेल्या व्हिडीओवरुन विराट कोहली, शिखर धवननंतर आता युवराज सिंगनेही नाराजी व्यक्त केलीये. युवराजनेही त्या चिमुरडीच्या आई-वडिलांवर जोरदार टीका केलीये.
युवराजने हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केलाय. तसेच तुम्ही तुमच्या मुलांचे असे संगोपन करत आहात? ही शरमेची गोष्ट आहे. आई-वडिलांनी आपल्या मुलांशी असे वागणे चुकीचेच आहे. तुमच्या मुलांना प्रेम आणि आपुलकीची गरज आहे. या मुलीसोबतचे असे वागणे सहनशक्तीच्या पलीकडचे आहे, असं युवराजने व्हिडीओ शेअर करताना म्हटलंय.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ २-३ वर्षाच्या चिमुरडीचा आहे. यात तिचे पालक तिला अंक म्हणण्यास सांगतायत. रडत रडत ती चिमुरडी अंक म्हणतेय. याचदरम्यान ती अंक म्हणताना चुकली तर तिच्या थोबाडीत लगावली जाते. चिमुरडी हात जोडून प्रेमाने शिकवण्याची विनंती करत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसतेय.