Asia Cup 2023 : जर नेपाळविरूद्धच्या सामन्यात...; 'या' समीकरणाने एशिया कपमधून बाहेर होईल टीम इंडिया!

Asia Cup 2023 : आता ग्रुप ए मधून पाकिस्तान टीमने सुपर 4 साठी क्विलिफाय केलं आहे. मात्र यामध्ये एक समीकरण असंही आहे, ज्यामुळे टीम इंडिया सुपर 4 साठी क्वालिफाय करू शकणार नाही.

सुरभि जगदीश | Updated: Sep 3, 2023, 06:44 PM IST
Asia Cup 2023 : जर नेपाळविरूद्धच्या सामन्यात...; 'या' समीकरणाने एशिया कपमधून बाहेर होईल टीम इंडिया! title=

Asia Cup 2023 : टीम इंडिया सध्या श्रीलंकेमध्ये असून एशिया कपच्या सामन्यांमध्ये व्यस्त आहे. 2 सप्टेंबर रोजी एशिया कपमध्ये भारत विरूद्ध पाकिस्तान ( India - Pakistan ) यांच्यात सामना रंगला होता. मात्र हा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. यावेळी दोन्ही टीम्सना एक-एक पॉईंट वाटून देण्यात आला. दरम्यान आता ग्रुप ए मधून पाकिस्तान टीमने सुपर 4 साठी क्विलिफाय केलं आहे. मात्र यामध्ये एक समीकरण असंही आहे, ज्यामुळे टीम इंडिया सुपर 4 साठी क्वालिफाय करू शकणार नाही.

पाकिस्तानविरूद्धचा सामना झाला रद्द

पाकिस्तान ( India - Pakistan ) विरूद्धच्या सामन्यात टीम इंडियाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी टीम इंडियाने 48.5 ओव्हरमध्ये 266 रन्स केले. मुसळधार पावसामुळे या सामन्याचा दुसरा डाव सुरू होऊ शकला नाही. काही वेळ वाट पाहिल्यानंतर सामनाधिकारी यांनी सामना रद्द केला असल्याचं घोषित केलं.

जर टीम इंडिया नेपाळशी हरली तर...

भारत आणि नेपाळ यांच्यात 4 सप्टेंबर रोजी सामना होणार आहे. टीम इंडियासाठी हा सामना 'करो या मरो'च्या स्थितीत अडकला आहे. दोन्ही ग्रुपचा सुपर 4 चा प्रवास उद्याच्या सामन्यानंतर स्पष्ट होणार आहे. जर टीम इंडिया नेपाळविरूद्धचा सामना हरली तर टीम थेट आशिया कपमधून बाहेर पडू शकते. जर हा सामना टीम इंडिया जिंकली तर थेट आशिया चषकाच्या सुपर 4 मध्ये प्रवेश मिळू शकतो. 

आशिया कपमधून बाहेर पडल्यानंतर टीम इंडियामध्ये बदल होणार 

नेपाळविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाचा पराभव झाला तर टीम इंडियामध्ये मोठे बदल पाहायला मिळण्याची शक्यता आहे. यावेळी टीम इंडियाच्या कर्णधारपदी दुसऱ्या खेळाडूची वर्णी लागू शकते. टीमची कमान रोहित शर्माकडून हिरावून घेतली जाऊ शकते. 

नेपाळविरूद्ध कशी असेल टीम इंडियाची प्लेईंग 11

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, इशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह.