बॉलिंग नाय भेटली रे... नाहीतर बुमराहने जिरवलीच असती; बॅटिंग करताना उतरवला पाकड्यांचा माज; पाहा Video

Jasprit Bumrah Viral Video : जसप्रीत बुमराहने आपल्या गोलंदाजीने नाही तर बॅटिंगमध्ये जलवा दाखवला. पाकिस्तानच्या तिकडीसमोर भारतीय फलंदाज पत्त्यासारखे गडगडले. 

सौरभ तळेकर | Updated: Sep 3, 2023, 06:03 PM IST
बॉलिंग नाय भेटली रे... नाहीतर बुमराहने जिरवलीच असती; बॅटिंग करताना उतरवला पाकड्यांचा माज; पाहा Video title=
Jasprit Bumrah Viral Video

India vs pakistan, Jasprit Bumrah : पाकिस्तानी बॉलिगं लाईनअपचा प्रमुख, डावखुरा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी याने भारताविरुद्ध आग ओकली. धारदार गोलंदाजी करत शाहीनने टीम इंडियाच्या दोन छाव्यांची शिकार केली. कॅप्टन रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या दोन मोलाच्या विकेट घेण्याचं काम शाहीन शाहने केलं. त्यामुळे कालच्या सामन्यात त्याचा जलवा पहायला मिळाला. तसेच हार्दिक पांड्याला देखील तंबुत पाठवण्याचं काम शाहीनने केलं. तर हॅरिस रौफने देखील दुसरी बाजू लावून धरली आणि शुभमन गिल, श्रेयस अय्यर आणि इशान किशनला माघारी पाठवलं. तर नसीम शाहने देखील 3 विकेट घेतल्या. मात्र, या तिघांना पुरून उरला तो टीम इंडियाचा जसप्रीत बुमराह...

जसप्रीत बुमराहने आपल्या गोलंदाजीने नाही तर बॅटिंगमध्ये जलवा दाखवला. पाकिस्तानच्या तिकडीसमोर भारतीय फलंदाज पत्त्यासारखे गडगडले. मात्र, इशान आणि हार्दिकने पाकिस्तानची वाट अडवली अन् त्यांना कडवी झुंज दिली. इशानने 82 धावा केल्या तर कानामागून आला अन् तिकट झाला अशी गत झालेल्या हार्दिकने मोलाची 87 धावांनी संयमी खेळी केली. इशान आणि हार्दिक बाद झाल्यावर टीम इंडिया आता अडीचशे तरी करेल का? असा सवाल विचारला जात होता. त्याचवेळी सर्वांच्या आशा मावळ्या असताना बुमराहने जलवा दाखवला.

बुमराह मैदानात आला तेव्हा त्याला साथ देत होता कुलदीप यादव. कुलदीपच्या बॅटला बॉल बसेना. त्यावेळी बुमराहने जबाबदारी स्विकारली अन् हॅरिस रौफ, नसीम शाह आणि शाहीन शाह आफ्रिदी या तिघांना तीन खणखणीत फोर मारले. बुमराह आता फुल विराच कोहलीच्या अंदाजात फलंदाजी करत होता. मात्र, 49 व्या ओव्हरच्या 5 व्या बॉलवर नसीम शाहला सिक्स मारण्याच्या नादात बुमराह बाद झाला. बुमराह ज्याप्रकारे फलंदाजी करत होता. ते पाहून पाकिस्तानने नक्कीच धास्ती घेतली असावी.

पाहा Video

दरम्यान, इशान फलंदाजी करत असताना हॅरिस रौफने इशानला बाद केलं. त्यावेळी त्याने इशानला तंबुत परतण्याचा इशारा केला. त्यावेळी त्याचा चेहरा रागाने लालबुंद झाला होता. मात्र, पाकिस्तानचा हा आनंद टिकू शकला नाही. बुमराहने बँटिंगने माज उतरवला खरा, पण बँलिंग भेटली नाही रे... नाहीतर बुमराहने जिरवली असती, अशी चर्चा चहाच्या कट्यावर होताना दिसत आहे.