वेस्ट इंडिजविरुद्ध लागोपाठ ८वी सीरिज जिंकण्यासाठी भारत मैदानात उतरणार

१ नोव्हेंबरला भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये वनडे सीरिजची शेवटची आणि पाचवी वनडे खेळवली जाईल.

Updated: Oct 31, 2018, 06:15 PM IST
वेस्ट इंडिजविरुद्ध लागोपाठ ८वी सीरिज जिंकण्यासाठी भारत मैदानात उतरणार title=

तिरुवनंतपुरम : १ नोव्हेंबरला भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये वनडे सीरिजची शेवटची आणि पाचवी वनडे खेळवली जाईल. जर भारतानं ही मॅच जिंकली तर ही हा वेस्ट इंडिजविरुद्धचा ११वा वनडे सीरिज विजय असेल. दोन्ही देशांमध्ये आत्तापर्यंत १९ वनडे सीरिज झाल्या आहेत. भारतानं याआधीच्या १८ वनडे सीरिजपैकी १० वनडे सीरिज जिंकल्या आहेत. तर ८ वनडे सीरिजमध्ये वेस्ट इंडिजचा विजय झाला. वेस्ट इंडिजनं भारताला २००६ साली शेवटचं हरवलं होतं. तेव्हा भारताचा ४-१नं पराभव झाला होता. तर भारतामध्ये वेस्ट इंडिजनं २००२साली शेवटची वनडे सीरिज जिंकली होती. त्यावेळी वेस्ट इंडिजनं ४-३नं सीरिज खिशात टाकली होती.

घरच्या मैदानात भारत २०१५ साली शेवटची सीरिज हारला होता. दक्षिण आफ्रिकेनं भारताला स्वदेशातच पराभवाची धुळ चारली होती. यानंतर भारताचा घरच्या मैदानात सीरिजमध्ये पराभव झालेला नाही. २००६ ते २०१७मध्ये भारत वेस्ट इंडिजविरुद्ध ७ वनडे सीरिज जिंकला आहे. तिरुवनंतपुरममध्ये याआधी झालेल्या भारत वेस्ट इंडिज मॅचमध्ये वेस्ट इंडिजचा अगदी सहज विजय झाला होता.