IND vs ZIM Melbourne Weather : टीम इंडियाच्या झिंम्बाब्वे विरूद्ध सामन्यावर पावसाचे सावट? हवामानाचा अंदाज काय?

Ind vs Zim Melbourne Weather Update: टीम इंडियाच्या सेमी फायनलच्य़ा शर्यंतीत अडथळा, झिंम्बाब्वे विरूद्ध सामना पावसामुळे रद्द होणार? 

Updated: Nov 6, 2022, 09:50 AM IST
 IND vs ZIM Melbourne Weather : टीम इंडियाच्या झिंम्बाब्वे विरूद्ध सामन्यावर पावसाचे सावट? हवामानाचा अंदाज काय? title=

Ind vs Zim Melbourne Weather Live Update: ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या टी20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) टीम इंडिया (Team India) उद्या रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली सुपर 12 मधला शेवटचा सामना खेळणार आहे.मेलबर्नच्या मैदानात झिंम्बाब्वे (Zimbabwe) विरूद्ध हा सामना रंगणार आहे. हा सामना जिंकुन टीम इंडिया सेमी फायनल (Semi final) तिकिट पक्क करणार आहे. मात्र टीम इंडियाच्या या स्वप्नावर पाऊस पाणी फेरण्याची शक्यता आहेत. कारण उद्याच्या सामन्यावर पावसाचे सावट असणार आहे. त्यामुळे उद्याच्या सामन्यापुर्वी हवामानाचा अंदाज काय आहे तो जाणून घेऊयात. 

ऑस्ट्रेलियातील मेलबर्न क्रिकेट मैदानावर टीम इंडियाचा (Team India) सामना रविवारी 6 नोव्हेंबरला झिंम्बाब्वेशी (Zimbabwe) होणार आहे. सुपर 12 मधला हा शेवटचा सामना असणार आहे. या सामन्यात विजय मिळवून टीम इंडिया सेमी फायनलमध्ये धडक मारणार आहे. मात्र पाऊस टीम इंडियाचा गेम करू शकतो. 

सामन्यात जर पाऊस पडून पराभव झाला तर टीम इंडिया (Team India) बाहेर होऊ शकते. तसेच सामन्यात पाऊस पडला आणि सुरुच झाला नाही तर दोघांनाही एक गुण मिळू शकतो. या गुणांमुळे टीम इंडिया 7 गुणांवर येईल. या गुणांसह टीम इंडिया सेमी फायनलमध्ये पोहोचेल, मात्र टॉपवर येण्याची शक्यता कमी आहे. कारण जर साऊथ आफ्रिकाने (South Africa) नेदरलँडसचा पराभव केला तर ती गुणतालिकेत टॉपवर येऊ शकते.

मेलबर्नचा खराब रेकॉर्ड 

मेलबर्न क्रिकेट मैदानावरील या वर्ल्ड कपमधील 3 सामने पावसामुळे रद्द करण्यात आले आहेत. त्याचवेळी पावसामुळे काही सामन्यांची मजा खराब झाली आहे, आणि  डकवर्थ लुईस नियमानुसार धक्कादायक निकाल समोर आले आहेत. त्यामुळे टीम इंडियाच्या बाबतीत असे धक्कादायक निकाल लागू नयेत अशी प्रार्थना क्रिकेट फॅन्स करत आहेत.  

मेलबर्नच हवामान काय? 

टीम इंडिया आणि झिंबाब्वे (India vs Zimbabwe Match Time ) यांच्यातील सामना ऑस्ट्रेलियात संध्याकाळी 7 वाजल्यापासून रंगणार आहे. त्यावेळी भारतात दुपारचे 1.30 वाजले असतील.Accuweather.com च्या मते, मेलबर्नमध्ये त्यावेळी पावसाची शक्यता नाही. मैदानावर प्रचंड थंडी असणार आहे. खेळादरम्यान तापमान 16 डिग्री सेल्सियस राहू शकते. याशिवाय वाऱ्याचा वेग ताशी 11 किलोमीटर राहील. आर्द्रता 83 टक्के राहील. सामन्याच्या दुसऱ्या डावात दव पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), अक्षर पटेल, आर अश्विन, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, भुवनेश्वर कुमार, ऋषभ पंत, दीपक हुडा, हर्षल पटेल, युझवेंद्र चहल.

झिंम्बाब्वे संघ : रेगिस चाकाब्वा (कर्णधार), सीन विल्यम्स, शॉन इर्विन, क्रेग एरविन, सिकंदर रझा, तेंडाई चत्रा, ल्यूक जोंगवे, ब्रॅड इव्हान्स, वेस्ली माधेवेरे, वेलिंग्टन मसाकादझा, टोनी मुन्योंगा, रिचर्ड नगारवा, रायन बुरले, शुम्बाबल्टन, ब्लेसिंग.