IND Vs WI : पत्त्यांप्रमाणे कोसळली विंडीज टीम; मोठ्या विजयासह भारताने जिंकली सिरीज

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 191 रन्सचं लक्ष्य दिलं होतं.

Updated: Aug 7, 2022, 07:42 AM IST
IND Vs WI : पत्त्यांप्रमाणे कोसळली विंडीज टीम; मोठ्या विजयासह भारताने जिंकली सिरीज title=

मुंबई : भारताने चौथ्या T20 सामन्यात वेस्ट इंडिजचा 59 रन्सने पराभव करत पाच सामन्यांची मालिका 3-1 अशी जिंकली. फक्त एक सामना बाकी आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 191 रन्सचं लक्ष्य दिलं होतं. मात्र याचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचा डाव गडगडला आणि अवघ्या 132 रन्सवर ऑलआऊट झाला.

मालिकेतील हा चौथा सामना अमेरिकेतील फ्लोरिडामध्ये खेळवला गेला. पावसामुळे सामना सुरू होण्यास थोडा उशीर झाला, मात्र येथे वेस्ट इंडिजने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारताने 191 रन्स केले होते. 

वेस्ट इंडिजकडून रोव्हमन पॉवेल आणि निकोलस पूरन यांनी 24-24 रन्स केले. तर उर्वरित फलंदाज मोठी खेळी करण्यामध्ये अपयशी ठरले. भारताकडून अर्शदीप सिंगने तीन, आवेश खान-अक्षर पटेल-रवी बिश्नोईने 2-2 विकेट्स घेतले.

टीम इंडियाची फलंदाजी

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने 191 धावा केल्या. ऋषभ पंतने टीम इंडियासाठी 44 रन्सची इनिंग खेळली. त्याने आपल्या इनिंगमध्ये 6 फोर मारले. त्यांच्याशिवाय संजू सॅमसननेही अखेरीस 30 रन्सची जलद खेळी केली.

कर्णधार रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांनी या सामन्यात भारताला वेगवान सुरुवात करून दिली. रोहित शर्माने अवघ्या 16 चेंडूत 33 रन्स केल्या. तर सूर्यकुमार यादवने 14 चेंडूत 24 रन्स ठोकले.

या सामन्यात भारताने एकूण तीन बदल केले होते. यामध्ये रवी बिश्नोई, अक्षर पटेल आणि संजू सॅमसन यांचा प्लेइंग-11 मध्ये समावेश केला होता. तर दुसरीकडे हार्दिक पांड्या, रविचंद्रन अश्विन आणि श्रेयस अय्यर यांना विश्रांती देण्यात आली होती.