IND vs WI: चौथ्या टी 20 सामन्यात अशी असेल Playing 11! 'या' खेळाडूला वगळण्याची शक्यता

चौथा T20 सामना निर्णायक ठरणार असून टीम इंडियात काही बदल पाहायला मिळू शकतात. प्लेइंग 11 मध्ये अनेक खेळाडूंचे पत्ते कापले जाऊ शकतात. 

Updated: Aug 4, 2022, 07:00 PM IST
IND vs WI: चौथ्या टी 20 सामन्यात अशी असेल Playing 11! 'या' खेळाडूला वगळण्याची शक्यता title=

India Vs West Indies T20 Series: भारतीय संघाने वेस्ट इंडिजविरुद्धचा पहिला टी-20 सामना जिंकला होता, मात्र दुसऱ्या टी-20 सामन्यात विंडीज संघाने भारताचा विजयी रथ रोखला आणि 1-1 ने बरोबरी केली. पण टीम इंडियाने तिसऱ्या टी-20 सामन्यात पुनरागमन करत वेस्ट इंडिजचा 7 गडी राखून पराभव करत मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली. आता चौथा T20 सामना निर्णायक ठरणार असून टीम इंडियात काही बदल पाहायला मिळू शकतात. प्लेइंग 11 मध्ये अनेक खेळाडूंचे पत्ते कापले जाऊ शकतात. 

पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या टी-20 सामन्यात सूर्यकुमार यादव कर्णधार रोहित शर्मासोबत सलामीला आला होता. सूर्यकुमार यादवची कामगिरी उत्कृष्ट राहिली असून टी-20 क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. तिसऱ्या T20 मध्ये त्याने मॅचविनिंग इनिंग खेळली. अशा परिस्थितीत हीच जोडी चौथ्या टी-20 मध्येही खेळताना दिसणार आहे. श्रेयस अय्यरला तिसरा क्रमांकावर चांगली कामगिरी करू शकलेला नाही. अशा स्थितीत त्यांच्या जागी दीपक हुड्डा याला संधी मिळू शकते. हुड्डाने आयर्लंड दौऱ्यावर झंझावाती शतक झळकावले होते.

मधली फळी अशी असेल

हार्दिक पांड्या आणि ऋषभ पंत अपेक्षित कामगिरी करु शकले नाही. पण हे दोघेही आवश्यक  खेळाडू आहेत. अशा स्थितीत कर्णधार रोहित शर्मा त्यांना पुन्हा संधी देईल. पहिल्या T20 सामन्यात दिनेश कार्तिकने आपला फिनिशर फॉर्म दाखवत सर्वांची मने जिंकली होती. त्याने 19 चेंडूत 41 धावा केल्या होत्या. सहाव्या क्रमांकावर त्याचे खेळणं जवळपास निश्चित आहे.

रवींद्र जडेजाला तिसऱ्या टी 20 मध्ये विश्रांती देण्यात आली होती. मात्र, आता जडेजा पुनरागमन करू शकतो. अशा स्थितीत फिरकी गोलंदाजीसाठी रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा ही जोडी पुन्हा मैदानात पाहायला मिळू शकते. भुवनेश्वर कुमार वेगवान गोलंदाजीची धुरा सांभाळेल. त्याला साथ देण्यासाठी अर्शदीप सिंगला स्थान मिळू शकते.

चौथ्या टी 20 साठी संभाव्य प्लेईंग इलेव्हन

रोहित शर्मा (कर्णधार), सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, ऋषभ पंत, दीपक हुडा, दिनेश कार्तिक, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा.