IND vs WI: पोर्ट ऑफ स्पेनमध्ये मोहम्मद सिराजने रचला इतिहास; 34 वर्षांनंतर कपिल देवच्या रेकॉर्डची बरोबरी!

Mohammed Siraj: पहिल्या डावात सिराजने भेदक गोलंदाजी करत कॅरेबियन खेळाडूंच्या दांड्या मोडल्या. याच बरोबर सिराजने 34 वर्ष जुन्या एका रेकॉर्डची बरोबरी केली आहे.

Updated: Jul 24, 2023, 03:43 PM IST
IND vs WI: पोर्ट ऑफ स्पेनमध्ये मोहम्मद सिराजने रचला इतिहास; 34 वर्षांनंतर कपिल देवच्या रेकॉर्डची बरोबरी! title=

Mohammed Siraj  Record: सध्या पोर्ट ऑफ स्पेन (Port of Spain) येथे खेळल्या जात असलेल्या भारत आणि वेस्ट इंडिज (West Indies vs India) यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामना आता रंगतदार स्थितीत पोहोचला आहे. चौथा दिवस संपत आला असला तरी निकाल कोणत्या बाजूने लागेल यावर अद्याप शिक्कामोर्तब झालं नाही. शेवटच्या दिवशी वेस्ट इंडिजला 289 धावांचं आव्हान पार करावं लागणार असल्याने आता दोन्ही संघात चुरस निर्माण झालीये. 

चौथ्या दिवशी भारताला दुसरी कसोटी (IND vs WI 2nd Test) जिंकण्यासाठी आठ विकेट्सची गरज असून वेस्ट इंडीजला मालिका बरोबरीत सोडवण्यासाठी मेहनत घ्यावी लागणार आहे. त्यामुळे आता दोन्ही संघांना समान संधी असल्याने आता सामना कोणाच्या पारड्याच झुकणार यावर सर्वांचं लक्ष आहे. मात्र, या सामन्यात सर्वांच्या नजरेत भरलाय तो मोहम्मद सिराज (Mohammed Siraj)... पहिल्या डावात सिराजने भेदक गोलंदाजी करत कॅरेबियन खेळाडूंच्या दांड्या मोडल्या. याच बरोबर सिराजने 34 वर्ष जुन्या एका रेकॉर्डची बरोबरी केली आहे.

कपिल देव यांच्या रेकॉर्डची बरोबरी

पोर्ट ऑफ स्पेन (Port of Spain) येथे कसोटीच्या एका डावात 5 बळी घेणारा सिराज (Mohammed Siraj) भारताकडून दुसरा गोलंदाज ठरला आहे. सिराजच्या आधी 1989 मध्ये भारताचा माजी कर्णधार कपिल देव (Kapil Dev) पोर्ट ऑफ स्पेनमध्ये 5  विकेट घेणारा पहिला गोलंदाज ठरला होता. आता तब्बल 35 वर्षांनंतर मोहम्मद सिराजने जुन्या विक्रमाची पुनरावृत्ती केल्याचं पहायला मिळतंय. वेस्ट इंडिजच्या पहिल्या डावात सिराजने जोशुआ दा सिल्वा, जेसन होल्डर, अल्जारी जोसेफ, केमार रोच आणि शैनन गेब्रियल या फलंदाजांना बाद केलं.

दरम्यान, सामन्याच्या चौथ्या दिवशी भारतीय फलंदाजांनी दुसऱ्या डावात टी-ट्वेंटीसारखी फलंदाजी केली आणि दुसरा डाव 2 बाद 181 धावांवर घोषित केला. त्यानंतर आता वेस्ट इंडिज (West Indies) दुसरा डाव खेळत आहे. वेस्ट इंडिजने आत्तापर्यंत 76 धावा करत 2 विकेट गमावल्या आहेत. पाचव्या दिवशी वेस्ट इंडिजला सामना जिंकण्य़ासाठी आणखी 289 धावांची गरज आहे. आता तर आता पाचव्या दिवशी आणखी 8 विकेट घेऊन भारत सामन्यात मुसंडी मारणार का? असा सवाल विचारला जातोय. आर आश्विनने (Ravichandran Ashwin) दुसऱ्या डावात 2 विकेट घेत मजबूत आघाडी मिळवून दिली आहे. त्यामुळे आता आश्विन जडेजाची जोडीच्या कामगिरीवर सर्वांचं लक्ष असणार आहे.