IND vs SL: 'या' तारखेपासून भारत विरुद्ध श्रीलंका सीरिज, वाचा टीम B चं संपूर्ण शेड्युल

टीम इंडियाची पहिली टीम इंग्लंड दौऱ्यावर आहे. तर दुसरी टीम जुलै  महिन्यात या देशाचा दौरा करणार, टीम Bचं नेतृत्व कोणाच्या खांद्यावर? जाणून घ्या सविस्तर

Updated: Jun 8, 2021, 09:04 AM IST
IND vs SL: 'या' तारखेपासून भारत विरुद्ध श्रीलंका सीरिज, वाचा टीम B चं संपूर्ण शेड्युल  title=

मुंबई: टीम इंडियाची A टीम इंग्लंड दौऱ्यावर आहे. 18 ते 22 जून दरम्यान वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना न्यूझीलंड विरुद्ध खेळणार आहे. त्यानंतर 4 ऑगस्टपासून इंग्लंड सीरिज देखील खेळणार आहे. तर टीम इंडियाची दुसरी म्हणजे B टीम जुलै महिन्यात श्रीलंका दौऱ्यावर असणार आहे. श्रीलंका विरुद्ध भारत टी 20 आणि वन डे सीरिज खेळवली जाणार आहे. बीसीसीआयने अद्याप श्रीलंका दौऱ्याचा संपूर्ण कार्यक्रम जाहीर केला नसला तरी ब्रॉडकास्टर्सनी शेड्युल सांगितल्याने आता चर्चा होऊ लागली आहे. मात्र BCCIकडून अधिकृत घोषणा होणं अद्याप बाकी आहे. 

टेन स्पोर्टने सोशल मीडियावप यासंदर्भात ट्वीट करून माहिती दिली. मात्र काही वेळानंतर ही ट्वीट डिलीट देखील करण्यात आलं. टेन स्पोर्ट्सच्या म्हणण्यानुसार भारत विरुद्ध श्रीलंका पहिला सामना 13 जुलैला खेळवला जाणार आहे. 13, 16 आणि 18 जुलै रोजी वन डे सीरिज होणार आहे. त्यानंतर 21, 23 आणि  25 जुलै रोजी टी 20 सीरिज होणार आहे. सर्व सामने एकाच स्टेडियमवर खेळवले जाणार आहेत. 

कोलंबो इथल्या प्रेमदासा स्टेडियममध्ये हे सर्व सामने खेळवले जातील असं सांगण्यात आलं आहे. श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडियामध्ये अनेक नव्या खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. तर सर्व सीनियर खेळाडू इंग्लंड दौऱ्यावर असल्यानं शिखर धवनच्या खांद्यावर नेतृत्वाची धुरा दिली जाणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. 

श्रीलंका दौऱ्यादरम्यान श्रेयस अय्यर खेळणार की नाही याबाबत सध्या तरी शंका आहे. याचं कारण म्हणजे श्रेयस अय्यर आताच खांद्याच्या दुखापतीमधून शस्त्रक्रिया झाल्यानंतर थोडा सावरत आहे. त्यामुळे लगेच मैदानात खेळण्यासाठी उतरणार की नाही याबाबत थोडी शंका आहे. पृथ्वी शॉ, देवदत्त पडिक्कल, नीतीश राणा मैदानात उतरण्याची शक्यता आहे. युवा खेळाडू ही सीरिज कशा पद्धतीने खेळतात याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.