मुंबई : उत्तम गोलंदाज हा टीमसाठी सर्वात महत्त्वाचा भाग असतो. आयर्लंड विरुद्ध होणाऱ्या सामन्यात टीम इंडियासाठी युवा खेळाडूंची गरज असणार आहे. श्रीलंका सीरिजनंतर टीम इंडियाला आयर्लंड सीरिज खेळायची आहे. या सीरिजसाठी काही दिग्गज खेळाडूंना आराम दिला जाऊ शकतो. तर युवा खेळाडूंनी टीम इंडियाकडून खेळण्याची संधी दिली जाणार आहे. यावेळी एक धडाकेबाज
चेतन सकारियाला आयर्लंड विरुद्ध टी 20 सामन्यासाठी संधी देण्यात येऊ शकते. दिग्गज खेळाडू इंग्लंड विरुद्ध खेळण्याची तयारी करणार आहेत. त्यामुळे आयर्लंड विरुद्ध टीम इंडिया सामन्यासाठी अनेक नवीन खेळाडूंना टीम इंडियामधून खेळण्याची संधी मिळू शकते.
चेतननं आयपीएलमध्ये देखील उत्तम कामगिरी केली होती. मात्र राजस्थान संघाने त्याला पुन्हा 2022 च्या आयपीएल हंगामासाठी रिटेन केलं नाही. राजस्थानकडून गेल्यावर्षी खेळताना 14 सामन्यात 14 विकेट्स घेतल्या होत्या. सध्या तो घरच्या मैदानावर उत्तम कामगिरी करत आहे. आता त्याला टीम इंडियामध्ये खेळण्याची संधी मिळू शकते.
चेतन सकारियाने विजय हजारे ट्रॉफीमध्ये जबरदस्त फॉर्म दाखवला होता. चेतनन 7 सामने खेळून 13 विकेट्स घेतल्या आहेत. सौराष्ट्र टीमकडून खेळताना सर्वाधिक विकेट्स घेणारा तो खेळाडू ठरला आहे. त्याने तमिळनाडू विरुद्ध खेळताना 5 विकेट्स घेतल्या होता. 10 ओव्हरमध्ये 62 रन देऊन 5 विकेट्स घेतल्या.
चेतनवर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी होती. तरीही चेतननं क्रिकेट खेळणं सोडलं नाही. ट्रेनिंगसाठी त्याच्याकडे शूज नव्हते. चेतन कुटुंब चालवण्यासाठी छोटं मोठं काम करायचा मात्र क्रिकेटसाठी त्याला नोकरी सोडावी लागली. आता चेतन साकरियाला टीम इंडियामध्ये खेळण्याची संधी मिळणार आहे.
चेतन सकारियाने आयपीएल 2021 मध्ये जबरदस्त कामगिरी केली होती. त्याने 14 विकेट्स आपल्या नावावर केल्या. महेंद्र सिंह धोनी, सुरेश रैना, केएल राहुल, नीतीश राणा सारख्या दिग्गज फलंदाजांना त्याने आऊट केलं होतं. धोनीला आऊट करतानाचा तो क्षण चेतनसाठी खूप खास होता.