IND vs SL T20 Series | टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका टी 20 मालिकेआधी स्टार ऑलराउंडरला कोरोना, कोण आहे तो खेळाडू?

टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका (IND vs SL T20 Series) यांच्यात 24 फेब्रुवारीपासून 3 सामन्यांची टी 20 मालिका खेळवण्यात येणार आहे.   

Updated: Feb 23, 2022, 02:54 PM IST
IND vs SL T20 Series | टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका टी 20 मालिकेआधी स्टार ऑलराउंडरला कोरोना, कोण आहे तो खेळाडू? title=
प्रातिनिधिक छायाचित्र

मुंबई :  टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका (IND vs SL T20 Series) यांच्यात 24 फेब्रुवारीपासून 3 सामन्यांची टी 20 मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेआधी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियाच्या 2 स्टार खेळाडूंना दुखापत झाली आहे. त्यामुळे त्यांना टी 20 मालिकेला मुकावं लागलं आहे. बॅट्समन सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि बॉलर दीपक चाहरला (Deepak Chahar) दुखापतीमुळे बाहेर पडावं लागलं आहे. त्यानंतर आता श्रीलंकेला मोठा धक्का बसला आहे. (ind vs sl t20i series sri lanka all rounder player wanindu hasranga tetsted again corona positve before team india t 20i series)

श्रीलंकेचा ऑलराऊंडर आणि आयपीएलच्या 15 व्या मोसमाच्या मेगा लिलावात महागडा ठरलेला वानिंदु हसरंगाला (Wanindu Hasaranga)  कोरोनाची लागण झाली आहे. चिंताजनक बाब म्हणजे अवघ्या काही दिवसांमध्ये वानिंदुला दुसऱ्यांदा कोरोना झाला आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने याबाबतची माहिती दिली आहे.

श्रीलंका टीम ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर होती. यावेळेस हसरंगाला कोरोना झाला होता. यानंतर भारत दौऱ्यावर आल्यानंतर प्रोटोकॉलनुसार मंगळवारी 22 फेब्रुवारीला वानिंदुची रॅपिड एंटीजेन टेस्ट करण्यात आली. यामध्ये त्याचा रिपोर्ट पॉ़झिटिव्ह असल्याचं समोर आलं.  

याआधी वानिंदुला 15 फेब्रुवारीला कोरोना झाला होता. त्यावेळेसही त्याच्या रॅट चाचणीचा (Rapid Antigen Test) अहवाल पॉझिटिव्ह आला होता. दरम्यान जोवर वानिंदुचा रिपोर्ट निगेटिव्ह येत नाही, तोवर त्याला आयसोलेशमध्ये ठेवण्यात येणार असल्याचं श्रीलंका क्रिकेट बोर्डाने ट्विटमध्ये म्हटलंय. 

टी 20 सीरिजसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कॅप्टन), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, इशान किशन (विकेटकीपर), व्यंकटेश अय्यर, दीपक चहर, दीपक हुडा, रवींद्र जाडेजा, युजवेंद्र चहल, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल आणि आवेश खान.