मुंबई : टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका (IND vs SL T20I Series) यांच्यात आज (26 फेब्रुवारी) टी 20 मालिकेतील दुसरा सामना खेळवण्यात येणार आहे. या 3 सामन्यांच्या मालिकेत टीम इंडिया 1-0 ने आघाडीवर आहे. दुसरा सामना जिंकून मालिका विजयाचा मानस टीम इंडियाचा आहे. त्याआधी टीम इंडियाला मोठा धक्का झटका बसला आहे. (ind vs sl t 20i series team india star opener ruturaj gaikwad ruled out series due to wrist injury mayank agrwal replaced him for remaining 2 matches)
तिसरा खेळाडू दुखापतीमुळे 'आऊट'
सूर्यकुमार यादव आणि दीपक चाहरनंतर टीम इंडियाच्या तिसऱ्या खेळाडूला टी 20 मालिकेला मुकावं लागलं आहे. बीसीसीआयने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.
टीम इंडियाचा आणि आयपीएलमध्ये चेन्नईकडून खेळणारा स्टार ओपनर बॅट्समन ऋतुराज गायकवाड दुखापतीमुळे (Ruturaj Gaikwad ruled Wrist Injury) टी 20 मालिकेतून बाहेर झाला आहे. बीसीसीआयने (Bcci) याबाबतची माहिती ट्विट करत दिली आहे.
गुरुवारी लखनऊमध्ये पहिला टी 20 सामना खेळवण्यात आला. त्याआधी ऋतुराजने उजव्या हाताचा मनगट दुखत असल्याची तक्रार केली होती. त्यानुसार बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाने त्याची तपासणी केली होती.
त्यानुसार एमआरआय स्कॅन करण्यात आला. यानंतर तज्ञांच्या सल्ला घेण्यात आला. मात्र अखेर ऋुतुराजला या मालिकेला मुकावं लागलंच.
आता ऋतुराज बंगळुरुतील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत दुखापतीवर मेहनत घेणार आहे. एनसीएत ऋतुराजच्या सोबतीला सूर्यकुमार यादव आणि दीपक चाहर हे दोघेही असतील.
ऋुतुराजच्या जागी कोणाला संधी?
दरम्यान ऋुतुराजच्या जागी निवड समितीने मयंक अग्रवालचा उर्वरित 2 टी 20 मॅचसाठी संघात समावेश केला आहे.
धोनीचं टेन्शन वाढलं
दरम्यान ऋुतुराजला दुखापत झाल्याने टीम इंडियासह चेन्नई आणि पर्यायाने कॅप्टन महेंद्रसिंह धोनीच्या डोकेदुखीत वाढ झाली आहे. ऋुतुराज आयपीएलमध्ये चेन्नईकडून खेळतो.
ऋतुराज गेल्या 14 व्या मोसमातील ऑरेन्ज कॅप होल्डर होता. एका मोसमात सर्वाधिक धावा करणाऱ्या बॅट्समनला ऑरेन्ज कॅप दिली जाते. मात्र आता आयपीएलच्या तोंडावर ऋतुराजला दुखापत झाल्याने धोनीचंही टेन्शन वाढलंय. त्यामुळे ऋतुराज लवकरात लवकर बरा व्हावा, यासाठी चेन्नईनेही त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.
टी 20 सीरिजसाठी सुधारित टीम इंडिया : रोहित शर्मा (कॅप्टन), श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, ईशान किशन (विकेटकीपर), व्यंकटेश अय्यर, दीपक हुडा, रवींद्र जाडेजा, युझवेंद्र चहल, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), आवेश खान आणि मयंक अग्रवाल.
NEWS - Ruturaj Gaikwad ruled out of T20I series.
More details here - https://t.co/wHy55tYKfx @Paytm #INDvSL pic.twitter.com/9WM1Iox0ag
— BCCI (@BCCI) February 26, 2022