मुंबई : चाहत्यांची अखेर प्रतीक्षा संपली आहे. याचं कारण म्हणजे आयपीएल 2022 च्या 15 व्या हंगामाचं संपूर्ण शेड्युल जारी करण्यात आलं आहे. यंदा 10 संघ 70 सामने खेळवण्यात येणार आहेत. यावर्षीचा फॉरमॅट थोडा वेगळा असणार आहे. दोन ग्रूपमध्ये 10 संघांची विभागणी करण्यात आली आहे. जाणून घेऊया कधी कुठे कसे होणार सामने कसं आहे संपूर्ण शेड्युल.
IPL 2022 चं शेड्युल IPL च्या ट्वीटरवर शेअर करण्यात आलं आहे. स्पर्धेची सुरुवात गेल्यावर्षीचा विनर संघ CSK पहिला सामना खेळून कऱणार आहे. CSK विरुद्ध KKR पहिला सामना 26 मार्च रोजी संध्याकाळी 7.30 वाजता होणार आहे. आयपीएल 2022 चा शेवटचा सामना देखील वानखेडेवर खेळला जाईल ज्यामध्ये पंजाब किंग्जचा सामना सनरायझर्स हैदराबादशी होणार आहे.
हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात 7व्यांदा मोसमाचा सलामीचा सामना रंगणार आहे. याआधी दोन्ही संघांनी 6-6 सलामीचे सामने खेळले आहेत.
2011 च्या आयपीएलचा फॉरमॅट पुन्हा एकदा लागू करण्यात आला आहे. पहिल्या गटात मुंबई इंडियन्स, कोलकाता नाईट रायडर्स, राजस्थान रॉयल्स, दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौ सुपर जायंट्स असे संघ असणार आहेत. तर दुसऱ्या गटात चेन्नई सुपर किंग्ज, सनरायझर्स हैदराबाद, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, पंजाब किंग्ज आणि गुजरात टायटन्स संघ असणार आहेत.
70 लीगचे सामने मुंबई आणि पुणे इथे खेळवले जाणार आहेत. वानखेडे स्टेडियम आणि डीवाय पाटील स्टेडियमवर 20-20 सामने होणार आहेत. ब्रेबोर्न स्टेडियम, एमसीए इंटरनेशनल स्टेडियमवर प्रत्येकी 15 सामने होणार आहेत.
पहिला डबर हेडर सामना केव्हा?
आयपीएलच्या 15 व्या मोसमातला पहिला डबल हेडर सामना हा 27 मार्चला खेळवण्यात येणार आहे. एकाच दिवसात दोन सामने म्हणजे डबल हेडर. या हंगामातला पहिली डबल हेडर मॅच ही दिल्ली विरुद्ध मुंबई यांच्यात खेळवण्यात येणार आहे. या सामन्याचे आयोजन मुंबईतील बेब्रॉन स्टेडियममध्ये करण्यात आलंय. तर डबल हेडरमधील दुसरी मॅच पंजाब विरुद्ध बंगुळुर यांच्यात नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियममध्ये खेळवण्यात येईल.