IND vs SL T20 : भारत आणि श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यामध्ये 3 सामन्यांची टी-20 सिरीज खेळवली जाणार आहे. या सिरीजचा पहिला सामना उद्या 7.30 वाजता खेळवला जाणार आहे. पहिल्या टी-20 सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार हार्दिक पंड्या (Hardik Pnadya) मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. या सामन्यामध्ये पंड्या 2 खेळाडूंना टीमबाहेर बसवण्याची शक्यता आहे. शिवाय पहिल्या टी-20 साठी टीम इंडियाचं प्लेईंग 11 कसं असणार आहे, यावर एक नजर टाकूया.
श्रीलंकेविरूद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात कर्णधार हार्दिक पंड्या टीममधून 2 खेळाडूंना बाहेर बसवण्याची दाट शक्यता आहे. उद्याच्या सामन्यात ऑलराउंडर दीपक हुड्डा आणि लेग स्पिनर युझवेंद्र चहल यांना प्लेईंग 11 मधून बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो.
श्रीलंकेविरूद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात प्लेईंग 11 मध्ये शुभमन गिल, ईशान किशन, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर या खेळाडूंचा समावेश असणार आहे. अशातच दीपक हुड्डा आणि लेग स्पिनर युझवेंद्र चहल यांच्यासाठी टीममध्ये जागा नाहीये. यांच्याजागी अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर हे दोघंही उत्तम फलंजाजी आणि स्पिन गोलंदाजी करतात. त्यामुळे त्यांचा टीममध्ये समावेश केला जाईल.
श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या T20 सामन्यात शुभमन गिलसह ओपनर इशान किशन उतरणार आहे. तर सूर्यकुमार यादव तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरण्याची शक्यता आहे. राहुल त्रिपाठीला चौथ्या क्रमांकावर तर कर्णधार हार्दिक पंड्या पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरणार आहे.
यावेळी संजू सॅमसन सहाव्या क्रमांकावर उतरण्याची शक्यता आहे. वॉशिंग्टन सुंदरचे 7व्या तर अक्षर पटेल 8व्या नंबरवर फलंदाजीसाठी उतरणार. वॉशिंग्टन सुंदर ऑफ स्पिन गोलंदाजी करणार आहे. तर अक्षर पटेल लेफ्ट आर्म स्पिन गोलंदाजी करेल.
शुभमन गिल, ईशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव (उप-कर्णधार), राहुल त्रिपाठी, हार्दिक पांड्या (कर्णधार), संजू सॅमसन (विकेटकीपर), वॉशिंगटन सुंदर, अक्षर पटेल, अर्शदीप सिंह, उमरान मलिक आणि हर्षल पटेल.
टीम इंडिया आणि श्रीलंका (Sri Lanka) यांच्यामध्ये 3 सामन्यांची टी-20 सिरीजचा पहिला सामना 3 जानेवारी रोजी मुंबईत खेळवला जाणार आहे. श्रीलंकेविरूद्धच्या टी-20 सिरीजचं कसं असणार आहे, ते पाहूयात