IND vs SL : थरारक सामन्यात टीम इंडियाचा पराभव, श्रीलंकेचा 6 विकेट्सने विजय

 Ind vs SL, Asia Cup 2022 :  शेवटच्या ओव्हरपर्यंत गेलेल्या थरारक सामन्यात अखेर टीम इंडियाचा (Team India) पराभव झालाय. 

Updated: Sep 6, 2022, 11:31 PM IST
IND vs SL : थरारक सामन्यात टीम इंडियाचा पराभव, श्रीलंकेचा 6 विकेट्सने विजय title=

यूएई : शेवटच्या ओव्हरपर्यंत गेलेल्या थरारक सामन्यात अखेर टीम इंडियाचा (Team India) पराभव झालाय. श्रीलंकेने टीम इंडियावर (IND vs SL) 6 विकेट्सने विजय मिळवलाय. टीम इंडियासाठी हा 'करो या मरो'चा सामना होता. मात्र  श्रीलंकेच्या या विजयामुळे भारताचं आशिया कपमधील (Asia Cup 2022) आव्हान संपुष्टात आलंय. (ind vs sl asia cup 2022 sri lanka beat team india by 6 wickets in do or die match)

श्रीलंका प्लेइंग इलेव्हन : दासुन शनाका (कर्णधार), दनुस्का गुणाथिलका, पाथुम निस्सांका, कुसल मेंडिस, चरिथ असालंका, भानुका राजपक्षा, वनिंदू हसरंगा, चमिका करुणारत्ने, महीश थीकशाना, असिथा फर्नांडो आणि दिलशान मदुशंका. 

टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल, विराट कोहली, सुर्यकुमार यादव, ऋषभ पंत, दीपक हुड्डा, हार्दीक पांड्या, रविचंद्रन अश्विन, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार आणि अर्शदीप सिंह.