INDvsSA : दक्षिण आफ्रिका दौऱ्याआधी टीम इंडियाला मोठा धक्का

बुमराह आणि शमी जोडी एकत्र दिसणार मात्र 3 दिग्गज खेळाडू बाहेर गेल्यानं टीम इंडियाला तोटा होणार? 

Updated: Dec 9, 2021, 01:50 PM IST
INDvsSA :  दक्षिण आफ्रिका दौऱ्याआधी टीम इंडियाला मोठा धक्का title=

मुंबई: दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी टीम इंडियाचा संघ जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये विराट कोहलीला मोठा धक्का तर रोहित शर्मावर दोन मोठ्या जबाबदाऱ्या आल्या आहेत. एकीकडे अजिंक्य राहाणेचं उपकर्णधारपद काढून घेण्यात आलं. तर रोहित शर्माला उप-कर्णधारपद दिलं आहे. वन डेचं कर्णधारपदही रोहित शर्मा सांभाळणार आहे. 

दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील शेड्युलमध्ये बदल करण्यात आला आहे. कसोटी आणि वन डे सामने होणार आहेत. तर टी 20 सामने नंतर होतील असं सांगण्यात आलं आहे. 26 डिसेंबर ते 30 डिसेंबर पहिला कसोटी सामना होणार आहे. 3 ते 7 जानेवारी दुसरा कसोटी सामना होणार आहे. तर 11 ते 15 जानेवारी तिसरा कसोटी सामना होईल.

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिला वन डे सामना 19 जानेवारीला होणार आहे. तर 21 जानेवारीला दुसरा आणि 23 जानेवारीला तिसरा वन डे सामना होणार आहे.  या सीरिजआधी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. याचं कारण म्हणजे दुखापतीमुळे तीन खेळाडू टीम इंडियातून बाहेर झाले आहेत. किमान पुढचे 3 ते 6 आठवडे हे खेळाडू मैदानात खेळू शकणार नाहीत. 

विराट कोहली याचा कर्णधारपद सोडण्यास नकार; BCCIने थेट दाखवला बाहेरचा रस्ता, झाला मोठा खुलासा

शुभमन गिल, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा हे तीन खेळाडू दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार नाहीत. या खेळाडूंना आराम देण्यात आला आहे. दुसरीकडे जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, रोहित शर्मा आणि शार्दुल ठाकुर मैदानात उतरणार आहेत. तर हनुमा विहारीला देखील कसोटी सामन्यासाठी संधी देण्यात आली आहे. 

टीम इंडिया संघ 
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उप-कर्णधार), केएल राहुल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, ऋषभ पंत, ऋद्धिमान साहा, आर अश्विन, जयंत यादव, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकुर, मोहम्मद सिराज.

एका नव्या युगाची सुरुवात...Rohit Sharma कर्णधार झाल्यानंतर फॅन्सची प्रतिक्रिया

स्टँडबाय खेळाडू- नवदीप सैनी, सौरभ कुमार, दीपक चाहर, अरजन नागवासवाला.