मुंबई : भारत-दक्षिण आफ्रिकेतील पाचवा सामना पावसाअभावी रद्द झाल्याने मालिका 2-2ने बरोबरीत सुटली.या मालिकेतील खेळाडूंच्या कामगिरीवरून त्यांना T20 विश्वचषकात संधी देण्यात येणार आहे. मात्र संघातील एक खेळाडू पाचही सामन्यात फ्लॉप ठरलाय. त्याच्या बॅटीतून खूपचं कमी रन्स आले आहेत. तरीही भारतीय कोच राहूल द्रविडने त्याला संघात संधी दिली आहे.
दक्षिण आफ्रिकेविरूद्धचा भारतीय कर्णधार रिषभ पंत या मालिकेमध्ये फ्लॉप ठरलाय. एकही सामन्यात त्याला मोठी धावसंख्या करता आली नाही. 5 सामन्यांमध्ये त्याला 58 धावाचं करता आल्या. मालिकेत विजयातही त्याचा मोठा वाटा नव्हता. तसेच पाचही सामन्यात टॉस हारत असल्याने त्याच्या फॉर्म आणि कॅप्टन्सीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होते.तसेच टी20 विश्वचषकात ही त्याला संघात घेण्यावरून अनेक क्रिकेटप्रेमी आक्षेप नोंदवत आहेत.
द्रविडकडून पाठराखण
फ्लॉप ठरून सुद्धा रिषभ पंतची कोच राहूल द्रविडने पाठराखण केली आहे. राहुल द्रविड ऋषभ पंतबद्दल म्हणालाय, 'व्यक्तिशः त्याने आणखी काही धावा केल्या असत्या, पण त्याचा त्याच्याशी संबंध नाही. पुढच्या काही महिन्यांच्या आमच्या योजनांचा तो नक्कीच मोठा भाग आहे. तो पुढे म्हणतो, मला टीकात्मक दृष्टिकोन स्वीकारायचा नाही. मिडल ओव्हर्समध्ये खेळण्याची गरज होती. कधी कधी दोन-तीन सामन्यांच्या खेळावर एखाद्या खेळाडूचे भवितव्य ठरवणं अवघड असत.
ऋषभ पंतच्या कर्णधारपदाबाबत द्रविड म्हणाला, मालिकेतील पहिले दोन सामने गमावल्यानंतर संघाला पुनरागमन करण्यात त्याने चांगली भूमिका बजावली. 'संघाला ०-२ वरून परतवून लावणे, मालिका २-२ अशी बरोबरीत आणणे आणि विजयाच्या संधी निर्माण करणे ही चांगली कामगिरी होती. कर्णधारपद म्हणजे फक्त जिंकणे आणि हरणे नव्हे. तो (पंत) युवा कर्णधार आहे आणि शिकत आहे. आता त्यांचे मूल्यांकन करणे खूप घाईचे आहे आणि एका मालिकेनंतर ते केले जाऊ शकत नाही,असे म्हणत त्याने पाठराखण केली.