IND vs SA : रहाणे-पुजारा नाही, पुढच्या सामन्यात याचा पत्ता कट

उत्तम कामगिरीमुळे मिळाली होती संधी 

Updated: Jan 5, 2022, 09:02 AM IST
IND vs SA : रहाणे-पुजारा नाही, पुढच्या सामन्यात याचा पत्ता कट title=

मुंबई : भारतीय संघ यावेळा दक्षिण आफ्रिकेविरूद्ध तीन सामन्यांची टेस्ट सिरीजमध्ये व्यस्त आहे. यावेळी भारतीय संघ दुसऱ्या सामन्याकरता खेळच आहे. भारतीय संघ टेस्ट सीरिज जिंकल्यानंतर 1-0 ने पुढे आहे. दुसऱ्या टेस्ट अगोदर अशी चर्चा रंगली आहे की, उत्तम फलंदाज अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा या सामन्यात फ्लॉप ठरले तर त्यांना संघातून बाहेर काढलं जाईल. मात्र संघात असा एक फलंदाज आहे जो या दोन खेळाडूंच्या आधीच बाहेर जाईल. 

रहाणे - पुजारा अगोदर हा खेळाडू जाणार बाहेर 

भारतीय संघाचा ओपनिंग फलंदाज मयंक अग्रवालबाबत चर्चा रंगली आहे. मयंकचा ओपनर म्हणून खेळ खराब राहिला आहे. मयंक सुरूवातीला येऊन मोठी खेली करू शकत नसल्यामुळे इतर खेळाडूंवर मोठं प्रेशर येत होतं. 

मयंकला मॅचच्या सुरूवातीला चांगली सुरूवात मिळत असे. मात्र एका खराब शॉटमुळे तो कायमच आऊट होत असे. पहिल्या ओव्हरमध्ये 26 धावा करणारा मयंक दुसऱ्या ओव्हरमध्ये 23 धावा केला. 

भारतीय संघाची दमदार सुरूवात करण्याची मयंकवर जबाबदारी होती. मात्र तो फ्लॉप ठरला. यामुळेच मयंकवर संघाबाहेर जाण्याची वेळ आली आहे. 

कोहली येताच भारतीय संघातून 'हा' खेळाडू बाहेर 

पुढच्या सामन्यात खेळाडूचा पत्ता कट 

जोहान्सबर्ग कसोटीच्या दुसऱ्या डावातही मयंक अग्रवाल अपयशी ठरला होता आणि या कारणास्तव तो आता तिसऱ्या आणि अंतिम कसोटी सामन्यातून आपले कार्ड गमावू शकतो.

कारण भारतीय संघात एक खेळाडू आहे जो मयंकच्या जागी सलामीवीर म्हणून खेळू शकतो. मालिकेतील तिसरा कसोटी सामना 11 जानेवारी 2022 पासून केपटाऊनच्या न्यूलँड्स मैदानावर खेळवला जाईल.

त्यामुळे युवा फलंदाज प्रियांक पांचाल पांढऱ्या जर्सीमध्ये टीम इंडियासाठी आंतरराष्ट्रीय पदार्पण करू शकेल.

चांगल्या खेळानंतर मिळाली होती संधी 

प्रियांक पांचाळने अलीकडेच भारत-अ संघाकडून खेळताना दक्षिण आफ्रिका-ए विरुद्ध दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर चमकदार कामगिरी केली होती. ज्यासाठी त्याला टीम इंडियामध्ये निवड म्हणून बक्षीस मिळाले.

दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी रोहित शर्माला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली होती, ज्यामुळे प्रियांक पांचाल कसोटी संघात सामील झाला होता. आता हा फलंदाज पुढील कसोटीत टीम इंडियासाठी पदार्पण करू शकतो.

रहाणे - पुजाराची कमाल 

दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर भारतीय संघाने आपल्या दोन्ही सलामीवीरांच्या विकेट्स गमावून 85 धावा केल्या आहेत. भारताकडे सध्या 58 धावांची आघाडी आहे.

भारताकडून अजिंक्य रहाणे 11 आणि चेतेश्वर पुजारा 35 धावांवर खेळत आहेत. केएल राहुल ८ आणि मयंक अग्रवाल २३ धावांवर बाद झाला. दक्षिण आफ्रिकेकडून मार्को जॅन्सन आणि ड्वेन ऑलिव्हियरने 1-1 विकेट घेतली.