केपटाऊन : टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी (IND vs SA 3rd Test) 212 धावांचे आव्हान दिले आहे. टीम इंडियाकडे दुसऱ्या डावात 13 धावांची आघाडी होती. विराटसेनेचा दुसरा डाव 198 धावांवर आटोपला. त्यामुळे आफ्रिकेला विजयासाठी 212 धावांची आवश्यकता आहे. रिषभ पंतच्या (Rishabh Pant) नाबाद शतकी खेळीच्या जोरावर टीम इंडियाला आफ्रिकेला सन्मानजनक लक्ष्य देता आलं. (ind vs sa 3rd test day 3 team india give south africa 212 runs target for win at newlands cape town)
पंतचं चौथं कसोटी शतक
टीम इंडियाकडून रिषभ पंतने सर्वाधिक नाबाद 100 धावांची शतकी खेळी केली. पंतच्या कसोटी कारकिर्दीतील चौथं शतक ठरलं. पंतने 133 चेंडूत 6 फोर आणि 4 सिक्ससह शतक पूर्ण केलं. तसेच कर्णधार विराट कोहलीने 29 धावा केल्या. या दोघां व्यतिरिक्त इतर कोणत्याही फलंदाजाला 10 किंवा त्यापेक्षा अधिक धावा करता आल्या नाहीत.
आफ्रिकेकडून मार्को जॅनसेनने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तर लुंगी एन्गिडी आणि कागिसो रबाडा या दोघांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या.
कोण जिंकणार मालिका?
3 सामन्यांची कसोटी मालिका 1-1 ने बरोबरीत आहे. तिसरा सामना रंगतदार स्थितीत आहे. टीम इंडियाला आतापर्यंत एकदाही आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकता आलेली नाही. तसेच केपटाऊनमध्येही भारतीय संघाने एकदाही कसोटी सामना जिंकलेला नाही. त्यामुळे टीम इंडियाला या सामन्यासह मालिका जिंकत किर्तीमान रचण्याची संधी आहे. यामुळे विराटसेना हा कारनामा करत इतिहास रचणार का, याकडे सर्व क्रिकेट चाहत्याचं लक्ष लागून राहिलं आहे.
दक्षिण आफ्रिका | डीन एल्गर (कर्णधार), एडन मार्करम, कीगन पीटरसन, रॅसी व्हॅन डर ड्युसेन, टेम्बा बावुमा, काइल वेरेन (विकेटकीपर), मार्को जॅनसेन, कागिसो रबाडा, केशव महाराज, डुआन ऑलिव्हियर आणि लुंगी एनगिडी.
टीम इंडिया : केएल राहुल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कॅप्टन), अजिंक्य रहाणे, रिषभ पंत (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणि उमेश यादव.
That will be Tea on Day 3 of the 3rd Test.@RishabhPant17 brings up a fantastic ton as #TeamIndia post a total of 198 in the second innings.
Over to the bowlers now.
Scorecard - https://t.co/yUd0D0YyB7 #SAvIND pic.twitter.com/aegWfv554C
— BCCI (@BCCI) January 13, 2022