केपटाऊन : टीम इंडियाचा विकेटकीपर बॅट्समन रिषभ पंतने (Rishabh Pant Century) आफ्रिका विरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत शानदार शतक पूर्ण केलं आहे. रिषभने एकूण 133 चेंडूत 6 फोर आणि 4 सिक्ससह शतक पूर्ण केलं. रिषभच्या कसोटी कारकिर्दीतील हे चौथं शतक ठरलं. रिषभच्या या शतकामुळे टीम इंडियाला 200 पेक्षा अधिक धावांची आघाडी घेता आली. (ind vs sa 3rd test day 3 rishabh pant scored century against south africa at newlands cape town)
दक्षिण आफ्रिका | डीन एल्गर (कर्णधार), एडन मार्करम, कीगन पीटरसन, रॅसी व्हॅन डर ड्युसेन, टेम्बा बावुमा, काइल वेरेन (विकेटकीपर), मार्को जॅनसेन, कागिसो रबाडा, केशव महाराज, डुआन ऑलिव्हियर आणि लुंगी एनगिडी.
टीम इंडिया : केएल राहुल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कॅप्टन), अजिंक्य रहाणे, रिषभ पंत (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणि उमेश यादव.