टीम इंडियाचा ‘बोलो तारा रा रा’ डान्स...आफ्रिकेविरूद्धची सिरीज जिंकल्यानंतर धवन एंड कंपनी सेलिब्रेशनच्या मूडमध्ये

एकदिवसीय मालिका जिंकल्यानंतर सेलिब्रेशन करण्यात आलं आणि यावेळी त्यांनी पंजाबी गाण्यावर ठेका धरलाय.

Updated: Oct 12, 2022, 09:54 AM IST
टीम इंडियाचा ‘बोलो तारा रा रा’ डान्स...आफ्रिकेविरूद्धची सिरीज जिंकल्यानंतर धवन एंड कंपनी सेलिब्रेशनच्या मूडमध्ये title=

दिल्ली : दिल्लीत खेळल्या गेलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा सात विकेट्स राखून पराभव केला. या विजयासह टीम इंडियाने एकदिवसीय सिरीजही 2-1 अशी खिशात घातली. या सामन्यात भारताला विजयासाठी 100 रन्सचं लक्ष्य मिळालं होतं. जे त्यांनी 19.1 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. एकदिवसीय मालिका जिंकल्यानंतर सेलिब्रेशन करण्यात आलं आणि यावेळी त्यांनी पंजाबी गाण्यावर ठेका धरलाय.

शिखर धवनने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केलाय. ज्यामध्ये बोलो तारा रा रा... गाण्यावर सर्वजण जबरदस्त नाचताना दिसतायत. या व्हिडिओमध्ये टीमचे सर्व खेळाडू दिसत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. 

बोलो तारा रा रा... हे गाणं दलेर मेहंदीने गायलं आहे. हे गाणे 1995 मध्ये रिलीज झालं होतं. इतक्या वर्षांनंतरही या गाण्याची लोकप्रियता चाहत्यांमध्ये कायम आहे.

या वर्षी ऑगस्ट महिन्यात झिम्बाब्वे दौऱ्यावरही टीम इंडियाने एकदिवसीय मालिकेत त्यांचा पराभव केला होता, त्यावेळीही भारतीय खेळाडूंनी जल्लोष साजरा केला होता. त्यादरम्यान भारतीय खेळाडूंनी 'काला चष्मा'वर जोरदार डान्स केला. विशेष म्हणजे शिखर धवन त्या दौऱ्यावर संघाचा कर्णधार होता आणि त्याने डान्सचा व्हिडिओ शेअर केला होता.

टीम इंडियाचा विजय

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका तीन सामन्यांची मालिका टीम इंडियाने 2-1 नं खिशात घातली. तिसऱ्या सामन्यात भारताने टॉस जिंकत फिल्डींगचा निर्णय घेतला. हा निर्णय गोलंदाजांनी सार्थकी घातला. आफ्रिकेचा संपूर्ण टीम 99 या रन्सवर पव्हेलियनमध्ये परतली. भारतानं हे आव्हान 7 विकेट्, आणि 185 बॉल्स राखून पूर्ण केलं. मॅन ऑफ द सिरीज म्हणून मोहम्मद सिराज आणि मॅन ऑफ द मॅच म्हणून कुलदीप यादवला गौरवण्यात आलं.