2 वर्षांच्या चिमुकल्या अगस्त्याने Hardik Pandya ला दिलं अविस्मरणीय गिफ्ट; VIDEO व्हायरल

दोन वर्षांच्या अगस्त्याने आपल्या वडिलांना अशी भेट दिली आहे, जी हार्दिक कधीही विसरणार नाही.

Updated: Oct 12, 2022, 08:36 AM IST
2 वर्षांच्या चिमुकल्या अगस्त्याने Hardik Pandya ला दिलं अविस्मरणीय गिफ्ट; VIDEO व्हायरल title=

मुंबई : टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या 29 वर्षांचा झाला आहे. काल हार्दिकचा वाढदिवस होता. हार्दिकचा हा वाढदिवस त्याचा मुलगा अगस्त्याने आणखी खास बनवला आहे. दोन वर्षांच्या अगस्त्याने आपल्या वडिलांना अशी भेट दिली आहे, जी हार्दिक कधीही विसरणार नाही. खुद्द हार्दिकने याबाबत खुलासा केला आहे.

हार्दिक पांड्या सध्या मिशन टी-20 वर्ल्ड कपसाठी ऑस्ट्रेलियात आहे. यावेळी त्याचं कुटुंब एकत्र नाही. यामुळेच हार्दिकला पत्नी आणि मुलाची आठवण येतेय. हार्दिकने यापूर्वी पत्नीसाठी एक पोस्ट शेअर केली होती. आता मुलासाठी एक व्हिडिओ शेअर केला आहे.

हार्दिकने शेअर केला अगस्त्याचा व्हिडीओ

हार्दिकने एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये अगस्त्य त्याला बॅट देताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत हार्दिकने कॅप्शनमध्ये लिहिले की, "माझ्या वाढदिवसानिमित्त मी माझ्या मुलाची आणखीनच आठवण काढतोय. मला आतापर्यंत मिळालेली ही सर्वोत्तम भेट आहे. हार्दिकची पत्नी नताशानेही या पोस्टवर कमेंट करत हार्ट इमोजी पोस्ट केले आहेत."

दरम्यान पत्नी नताशा स्टॅनकोविकने इंस्टाग्रामवर (Natasha Stankovic Instagram Post) एक छान पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये नताशाने केशरिया (Kesariya) या प्रसिद्ध गाण्यावर हार्दिकसोबत घालवलेल्या क्षणांची क्लिप जोडून एक व्हिडिओ (Hardik Pandya Video) शेअर केलाय.

या व्हिडिओमध्ये नताशा हार्दिकचा पूलसाइड रोमान्स पहायला मिळतोय (Hardik Pandya Natasha Stankovic Romantic Video) आणि हार्दिकचा मुलगा अगस्त्यसोबतचे मजेदार क्षण आहेत.  या सुंदर व्हिडिओसाठी हार्दिक नताशा कपलला चाहत्यांकडून भरभरून प्रेम मिळत आहे. नताशाच्या या व्हिडिओवर चाहते हार्दिकचे अभिनंदन (Hardik Pandya Birthday) करत आहेत.