IND VS SA : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, 'या' खेळाडूंना विश्रांती

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी सिनियर खेळाडूंना विश्रांती, या युवा खेळाडूंना मिळाली संधी

Updated: Oct 2, 2022, 07:03 PM IST
IND VS SA : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, 'या' खेळाडूंना विश्रांती title=

मुंबई :  दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या (South africa) वनडे मालिकेसाठी टीम इंडियाची (team india) घोषणा करण्यात आली आहे. या संघात सिनियर खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे, तर युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. त्यामुळे नेमक्या कोणत्या संघाना स्थान देण्यात आले आहे, ते जाणून घेऊयात. 

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या (South africa) वनडे मालिकेसाठी टीम इंडियाचा (team india)  संघ जाहीर झाला आहे. T20 विश्वचषकापूर्वी (T20 world Cup) होणाऱ्या या मालिकेसाठी शिखर धवनला (Shikhar dhawan)  कर्णधारपद देण्यात आले आहे. तर रोहित शर्मा, विराट कोहली, के एल राहूल, हार्दिक पंड्या या सीनियर खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे.  

युवा खेळाडूंना संधी

सीनियर्स खेळाडूंना विश्रांती देण्यात आल्यामुळे युवा खेळाडूंना टीम इंडियात संधी मिळाली आहे. श्रेयस अय्यरला उपकर्णधार बनवण्यात आले आहे.  शुभमन गिल आणि ऋतुराज गायकवाड यांचे संघात पुनरागमन झाले आहे. तर देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या रजत पाटीदार, राहुल त्रिपाठी, शाहबाज अहमद, मुकेश कुमार यांना टीम इंडियामध्ये स्थान मिळाले आहे. तसेच फॅन्सच्या मागणीनंतर संजू सॅमसनला टीम इंडियात स्थान मिळाले आहे.

 एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रक

  • पहिला एकदिवसीय सामना – 6 ऑक्टोबर, लखनऊ
  • दुसरा एकदिवसीय सामना – 9 ऑक्टोबर, रांची
  • तिसरा एकदिवसीय सामना – 11 ऑक्टोबर, दिल्ली

दरम्यान भारताला 6 ऑक्टोबरपासून आफ्रिकेविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळायची आहे. या आधी टीम इंडिया टी20 मालिका खेळतेय. या मालिकते टीम इंडिया 1-0 ने आघाडीवर आहे. 

टीम इंडियाचा संघ : शिखर धवन (कर्णधार), श्रेयस अय्यर (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, रजत पाटीदार, राहुल त्रिपाठी, इशान किशन (डब्ल्यूके), संजू सस्मान (डब्ल्यूके), शाहबाज अहमद, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, रवी बिश्नोई, मुकेश कुमार, आवेश खान, मोहम्मद सिराज आणि दीपक चहर.

दक्षिण आफ्रिकेचा संघ: टेम्बा बावुमा (कर्णधार), क्विंटन डी कॉक, रीझा हेंड्रिक्स, हेनरिक क्लासेन, केशव महाराज, जेनेमन मालन, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, अॅनरिक नॉर्टजे, वेन पारनेल, एंडिले फेहलुक्वायो, डी. कागिसो रबाडा, तबरेझ शम्सी.