पर्थ : टी20 वर्ल्ड कपमध्ये (t20 world cup) टीम इंडिया (Team India) उद्या 23 ऑक्टोबरला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी भिडणार आहे. या सामन्यापुर्वी आज टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माची (Rohit sharma) एक पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत रोहितने टी20 वर्ल्ड कपवर नाव कोरण्यासह, सामन्यासाठीची तयारी यासह विविध मुद्यावर उत्तरे दिली. तसेच त्याने प्लेइंग इलेव्हनबाबतही मोठं विधान केलं.पाकिस्तान विरूद्धच्या प्लेइंग इलेव्हनबाबत तो काय म्हणालाय, हे जाणून घेऊयात.
हे ही वाचा : मौका-मौका!2007 चा करिष्मा 2022 मध्ये करून दाखवणार,रोहित शर्माने व्यक्त केला विश्वास
रविवारी 23 ऑक्टोबरला भारत आणि पाकिस्तानचे (India vs Pakistan) संघ आमनेसामने येणार आहेत. या सामन्यापूर्वी रोहित शर्माने (Rohit sharma) प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान केलं आहे. रोहित म्हणालाय,'सर्व खेळाडू या सामन्यासाठी पूर्णपणे तंदुरुस्त आहेत. त्यामुळे ही निश्चित क्रिकेट फॅन्ससाठी दिलासादायक बाब आहे.
रोहित (Rohit sharma) पुढे म्हणाला की, आम्ही सामन्यापूर्वी प्लेइंग इलेव्हन ठरवू. तसेच येथील परिस्थितीनुसार प्रत्येक सामन्यात प्लेइग इलेव्हन बदलण्याची गरज असेल त्यानुसार आम्ही तसे करणार असल्याचे तो म्हणालाय. त्यामुळे या स्पर्धेत टीम इंडिया प्लेइंग 11 मध्ये सतत बदल करताना दिसू शकते. मात्र कर्णधार रोहित नेहमीच प्लेइंग इलेव्हनमध्ये कमी बदल करण्यासाठी ओळखला जातो.
हे ही वाचा : टीम इंडियाच्या विजयात 'हे' 4 खेळाडू ठरतात अडथळा, जाणून घ्या
पत्रकार परिषदेत मेलबर्नच्या हवामानावर बोलताना रोहित शर्मा (Rohit sharma) म्हणाला, 'लोक 40 ओव्हर्सचा सामना पाहण्यासाठी येतात. मात्र जर पावसामुळे 5 ओव्हरचा सामना झाला तर खेळाडूंबरोबरच चाहत्यांचीही निराशा होते, असे तो म्हणाला.
मेलबर्नमध्ये सामन्याच्या दिवशी पावसाची शक्यताही 50-60 टक्के वर्तवली जात आहे.त्यामुळे उद्या हवामानाचे काय होणार हे देवालाच ठाऊक आहे. त्यामुळे पूर्ण सामना खेळायला मिळाला तर बरे होईल. पण तरीही येणाऱ्या परिस्थितीसाठी तयार राहावे लागेल,असेही रोहित (Rohit sharma) म्हणालाय.