IND vs PAK : मौका-मौका! 2007 चा करिष्मा 2022 मध्ये करून दाखवणार, रोहित शर्माने व्यक्त केला विश्वास

पाकिस्तान विरूद्ध सामन्यापुर्वी रोहित शर्माच मोठं विधान,पाकिस्तानी खेळाडूंना झोंबल्या मिर्चा 

Bollywood Life | Updated: Oct 22, 2022, 03:30 PM IST
IND vs PAK : मौका-मौका! 2007 चा करिष्मा 2022 मध्ये करून दाखवणार, रोहित शर्माने व्यक्त केला विश्वास title=

पर्थ : ऑस्ट्रेलियात (Australia) सुरू असलेल्या टी20 वर्ल्ड कपमध्ये (t20 world cup) आजपासून सुपर 12 सामन्याला सुरुवात झाली आहे. सुपर 12 मध्ये आज पहिला सामना ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या बलाढ्य संघात सुरु आहे. तर टीम इंडिया (Team india) उद्या 23 ऑक्टोबरला पाकिस्तानशी भिडणार आहे. या हायव्होल्टेज सामन्यापुर्वी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit sharma) प्रतिक्रिया दिली आहे. या प्रतिक्रियेनंतर पाकिस्तानचा चांगलाच जळफळाट झाला आहे.  

हे ही वाचा : भारत-पाक सामन्यात पावसाने 'गेम' केल्यास मॅच रद्द होणार?

टी20 वर्ल्ड कपच्या (t20 world cup) मोहिमेला सुरुवात होण्यापुर्वी रोहित शर्माने (Rohit sharma) पत्रकार परिषद घेतली आहे. या पत्रकार परिषदेत त्याने विविध मुद्यावर भाष्य केलं आहे. रोहित म्हणाला की, "गेल्या नऊ वर्षांत आम्ही एकही आयसीसी ट्रॉफी जिंकली नाही, त्यामुळे आमच्यासाठी हे खूप आव्हानात्मक असणार आहे. तसेच ही स्पर्धा आम्हाला हा ट्रेंड बदलण्याची चांगली संधी देत आहे. 

रोहित (Rohit sharma) पुढे म्हणतो, आम्हाला माहित आहे की आम्हाला आमचे सर्वोत्तम क्रिकेट खेळायचे आहे.त्यामुळे आम्ही एकावेळी एकच सामन्यावर लक्ष केंद्रीत करू. भारतासारख्या संघाकडून नेहमीच खूप अपेक्षा असतात, पण आम्ही त्यांना निराश करणार नाही. 

हे ही वाचा : रोहित शर्माचं पाकिस्तानलाच थेट आव्हान!

2007 चा करिष्मा 2022 मध्येही होण्याची शक्यता दिसत आहे. रोहितने (Rohit sharma)हे संघासाठी खूप आव्हानात्मक असणार असताना सांगितले की, "आम्ही याला दबाव म्हणणार नाही परंतु आमच्यासाठी सर्वांच्च स्थानी येणे नक्कीच आव्हानात्मक असणार आहे. तसेच मला वाटते आता येथे चांगली कामगिरी करण्याची संधी आली आहे. आम्हाला काही गोष्टींवर लक्ष केंद्रित करावे लागेल जेणेकरून त्या योग्य राहतील. 

रोहित शर्माने (Rohit sharma) टी20 वर्ल्ड कप (t20 world cup) आधी दिलेली ही प्रतिक्रिया पाकिस्तानच्या पचनी पडली नसेल.तसेच रोहित शर्माच्या या पत्रकार परिषदेनंतर पाकिस्तानला मिर्चा झोंबल्या आहेत.