मेलबर्न : मेलबर्नमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील टी-20 वर्ल्डकपचा 'महामुकाबाला' रविवार, 23 ऑक्टोबर रोजी रंगणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय कर्णधार रोहित शर्माने पत्रकार परिषद घेतली. यावेळी रोहितने पत्रकारांच्या अनेक प्रश्नांची उत्तरं दिली. दरम्यान या पत्रकार परिषदेदरम्यान रोहितला टीमच्या तयारीबाबत प्रश्न केले. यावर भारतीय कर्णधाराने आपल्या उत्तराने पत्रकाराची बोलतीच बंद केली.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना 23 ऑक्टोबर रोजी मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर होणार आहे. दोन्ही टीमचा सुपर-12 फेरीतील हा पहिलाच सामना असणार आहे. या सामन्यासाठी चाहते उत्सुक असून स्टेडियमची सर्व तिकिटं आधीच विकली गेलीयेत. मात्र पावसाच्या येण्याने चाहत्यांची निराशा होण्याची दाट शक्यता असते.
रोहित शर्माने शनिवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी एका पाकिस्तानी पत्रकाराने त्याला प्रश्न विचारला. या स्पर्धेत चढ-उतार आहेत, दोन वेळचा चॅम्पियन संघ वेस्ट इंडिज बाहेर गेलाय. ज्या टीम्स जिंकू शकणार नव्हत्या त्या देखील जिंकल्यात. पुढच्या सामन्यासाठी भारतच जिंकेल असं अनेकांना वाटतंय. तुझ्या मनात काही आहे का ज्यामुळे उलटफेर होऊ शकतो.
पाकिस्तानी पत्रकार ने पूछा #INDvPAK मैच पर सवाल, कप्तान @ImRo45 ने दिया ये जवाब..#T20WorldCup #RohitSharma pic.twitter.com/1wKCDGEZKo
— Tarun Vats/ तरुण वत्स (@vatstk) October 22, 2022
दरम्यान हा प्रश्न विचारताच रोहित शर्मा हसला. रोहितचं हसणं हेच पाकिस्तानी पत्रकारासाठी उत्तर होतं. कर्णधाराच्या या उत्तराने पत्रकाराची बोलती बंद झाली.
रोहित शर्मा पुढे म्हणाला की, "गेल्या नऊ वर्षांत आम्ही एकही आयसीसी ट्रॉफी जिंकली नाही, त्यामुळे आमच्यासाठी हे खूप आव्हानात्मक असणार आहे. तसेच ही स्पर्धा आम्हाला हा ट्रेंड बदलण्याची चांगली संधी देत आहे."